Central Railway : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनच्या ३० टक्के जागा रिक्त

136
मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागातील मोटरमन प्रचंड तणावाखाली असून, मोटरमनचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच मोटरमनच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त असल्याने, उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मंजूर १,०७६ पदांपैकी ३१३ मोटरमन पदे रिक्त आहेत. तर, फक्त ७६३ मोटरमन कार्यरत आहेत. मोटरमनची जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत.
रिक्त पदामुळे केवळ मोटरमन तणावाखाली नसून याचा परिणाम दैनंदिन लोकल फेऱ्यांवर होत आहे. मध्य रेल्वेवर दररोज १,८०१ लोकल फेऱ्या धावत आहेत. कामाचे तास वाढल्याने मोटरमनला येणारा थकवा आणि संभाव्य अपघात वेळीच रोखणे आवश्यक आहे. तसेच मोटरमनची रिक्त पदे (Central Railway) तातडीने भरणे आवश्यक आहे.

आरोग्यावर गंभीर परिणाम

रिक्त जागांमुळे इतर मोटरमनच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अवेळी जेवण, कुटुंबीयांना वेळ न देता येणे, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये रजा घेणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्त पदे तातड तातडीने भरणे आवश्यक आहे, असे सेंट्रल रेल्वे (Central Railway) सांगण्यात आले. भरती प्रक्रिया रखडत सुरू असल्याने, मोटरमनसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. कर्मचारी वर्गाचा कामाचा ताण वाढला आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केल्याने, भरीव कामगिरी होत नाही, असे रेल्वे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.
लोकल फेऱ्या चालवण्यासाठी इतर मोटरमनला जादा तास काम करावे लागत आहे. काही दिवसांपासून मोटरमन मुरधीधर शर्मा यांचा कामाच्या तणावामुळे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा दावा रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला होता. जादा तास काम केल्याने मोटरमन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो. तसेच मोटरमनच्या कमतरतेमुळे हक्काच्या सुट्टया घेताना अडचणी येत आहेत. कुटुंबीयाकडे दुर्लक्ष झाल्याने कौटुंबिक वातावरण बिघडत आहे, असे काही मोटरमनकडून सांगण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.