Mohammad Gaus : संघाचे नेते रुद्रेश यांची हत्या करणारा दहशवादी महंमद गौसला दक्षिण आफ्रिकेत अटक

एनआयएने मोहम्मद गौसवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते आणि तो भारतातील प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चा एक मोठा चेहरा होता.

172
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेता रुद्रेश यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय दहशतवादी मोहम्मद गौस नियाझीला (Mohammad Gaus) अटक करण्यात केंद्रीय तपास यंत्रणांना यश आले आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेत पकडण्यात आले आहे. एनआयएने मोहम्मद गौसवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते आणि तो भारतातील प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चा एक मोठा चेहरा होता. याशिवाय 2016 मध्ये बेंगळुरूमध्ये आरएसएस नेता रुद्रेश यांची हत्या केल्याचाही या दहशतवाद्यावर आरोप आहे. हत्येनंतर तो (Mohammad Gaus) फरार होता आणि वेगवेगळ्या देशात राहत होता.

गुजरात एटीएसने लोकेशन ट्रॅक केले

गुजरात एटीएसने प्रथम दक्षिण आफ्रिकेतील तो (Mohammad Gaus) राहत असलेल्या ठिकाणाचा माग घेतला, त्यानंतर त्याची माहिती केंद्रीय एजन्सीला दिली. त्यानुसार एनआयएने त्याला दक्षिण आफ्रिकेत पकडले. त्याला आता भारतात आणण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एएनआयकडे सोपवण्यात आला आहे. दिवसाढवळ्या रुद्रेश यांची हत्या करण्यात आली होती. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते घरी परतत असताना बेंगळुरूच्या शिवाजी नगरमध्ये त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुद्रेश यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही आठवड्यांतच चार जणांना अटक केली होती, त्यापैकी बहुतेकांचे वय तीस वर्षांच्या आसपास होते. मुख्य आरोपी 40 वर्षीय अझीम शरीफ याला पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली होती. हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रुद्रेश यांची हत्या करण्यात आली होती. हे दहशतवादी कृत्य आहे, असे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.