Moradabad Leopard Rescue : मोरादाबाद जिल्ह्यात ४८ तासांत तिसरा बिबट्या पिंजऱ्यात कैद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

बुधवारी कांठ येथील रामसराय भांकरी आणि गुरुवारी कांठ येथील भरतपूरमध्ये करण्यात आले बिबट्याचे रेस्क्यू

11
Moradabad Leopard Rescue : मोरादाबाद जिल्ह्यात ४८ तासांत तिसरा बिबट्या पिंजऱ्यात कैद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Moradabad Leopard Rescue             उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वारा तहसीलमधील बळिया वल्लभगड गावात शुक्रवारी सकाळी एका बिबट्याला पिंजऱ्याच्या माध्यमातून यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पिंजऱ्याद्वारे रेस्क्यू करण्यात आलेला हा १७ वा बिबट्या आहे. जिल्ह्यात ४८ तासांच्या कालावधीत हा तिसरा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. (Moradabad Leopard Rescue)

(हेही वाचा – MSRTC : NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM App द्वारे सहज करता येणार Top-up)

यापूर्वी गुरुवारी कांठ तहसील क्षेत्रातील भरतपूर येथे आणि बुधवारी कांठ येथील रामसराय भांकरी येथे प्रत्येकी एका बिबट्याला पिंजरा लावून यशस्वीपणे पकडण्यात आले होते. ठाकूरद्वारा क्षेत्रात बिबट्याने तीन महिलांसह चार जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पॅंसिया यांनी सांगितले की, संवेदनशीलतेच्या दृष्टीने वन विभागाच्या देखरेखीखाली रेस्क्यू टीम सतत कार्यरत आहे. तसेच प्रशासकीय पातळीवरून संपूर्ण संवेदनशील भागातील गावांमध्ये सतर्कता आणि जागृतीसाठी चौपाल (बैठका) आयोजित केल्या जात आहेत. या संवेदनशील क्षेत्रातून आतापर्यंत १७ बिबट्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. (Moradabad Leopard Rescue)

(हेही वाचा – FDA चा राज्यभरात ‘महाछापा’! नागपुरात १२ लाखांचा गुटखा पकडला; मुंबईतील १४ आस्थापनांचे परवाने निलंबित)

वन विभागाच्या रेस्क्यू टीमला मोरादाबादच्या ठाकूरद्वारा तहसीलमधील बळिया वल्लभगड गावात शुक्रवारी सकाळी ६ वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता त्याची वैद्यकीय/शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याला दाट जंगलात सोडले जाईल, जेणेकरून तो पुन्हा मानवी वस्ती किंवा गावाकडे येणार नाही. (Moradabad Leopard Rescue)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.