MMRC : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ‘टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर’ आणि ‘सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर’ पुरस्कार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) ला 'टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

119
MMRC : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 'टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर' पुरस्कार
MMRC : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 'टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर' पुरस्कार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ला ‘टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर’ आणि ‘सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये प्रतिष्ठित अशा टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (TAI) द्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. बोगदे आणि भूमिगत बांधकामातील सर्वोत्तम नवकल्पना आणि उत्कृष्ट प्रकल्पाकरता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासह संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता तसेच मुं.मे.रे.कॉ.च्या इतर अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. (MMRC)

टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (TAI) हा आंतरराष्ट्रीय टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (ITA) चा भारतीय शाखा असून त्याची स्थापना १९९१ मध्ये भारत सरकारच्या केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाच्या अधिपत्याखाली करण्यात आली. मुंबई येथे आयोजित “टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेसमध्ये हवामानातील लवचिकता आणि टिकाऊपणा” या विषयावर सुरू असलेल्या टनेलिंग एशिया २०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, हरदीप सिंग पुरी हे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या परिषद उद्घाटन सत्रात सहभागी झाले होते. (MMRC)

आयटीए टनेलिंग अवॉर्ड्स २०२३ चे हे नववे वर्ष आहे. ‘टनेलिंग एशिया’ २०२३ ही आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (ITA) च्या नेतृत्वाखाली टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (TAI) द्वारे आयोजित द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे. २०१५ पासून आयटीए टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस अवॉर्ड्स हे बोगदे आणि भूमिगत बांधकामातील सर्वोत्तम नवकल्पना आणि उत्कृष्ट प्रकल्पांना सन्मानित करतात. (MMRC)

“टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर श्रेणीमध्ये पुरस्कार मिळणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. अत्यंत कठिण आणि गर्दीच्या भागातून जाणार्‍या संरेखनामुळे मेट्रो-३ हा प्रकल्प एक अभियांत्रिकी अविष्कार ठरला आहे. गजबजलेल्या भागातून मार्ग काढणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, स्थानिकांचे पुनर्वसन करणे, समुद्रकिनार्‍याजवळ बोगदे बांधणे तसेच पाण्याखालून भुयारी मार्ग काढणे, यांसारख्या अनेक आव्हानांना या प्रकल्पादरम्यान सामोरे जावे लागले. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्याने ही आव्हाने यशस्वीरित्या पार करण्यात आली. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय विभाग यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प सध्याच्या टप्प्यात येण्यास सोयीस्कर झाले आहे”, असे मत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. (MMRC)

(हेही वाचा – Marathi Signboards : येत्या मंगळवारपासून मुंबईतील सुमारे पाच हजार दुकानांवर कारवाई)

“इमारत व त्यातील रहिवाशांची, शहरवासीयांची तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आणि संरचनात्मक अखंडता सुनिश्चित करताना हा प्रकल्प राबविणे हे आमच्यासाठी नेहमीच प्रथम प्राधान्य राहिले आहे. तपशिलवार प्रक्रिया व आखून दिलेली नियमावली तसेच प्रकल्पावर तैनात असलेल्या प्रत्येक कामगाराचे सुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य करणे. त्यांना विस्तृत उपकरणे उपलब्ध करून देणे. तसेच यंत्रणेद्वारे कामगारांवर देखरेख ठेवणे हे या प्रकल्पादरम्यान सुनिश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या ७ वर्षातील २५० दशलक्ष तासामागे कामगारांना कामाच्या ठिकाणी दुखापत होण्याचा सरासरी दर ०.३४ इतका आहे. जो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांमधील दुखापतीच्या घटनांच्या सरासरी दर ०.५ च्या मानाचे खूपच कमी आहे”, असे यावेळी मुं.मे.रे.कॉ. चे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता म्हणाले. (MMRC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.