Marathi Signboards : येत्या मंगळवारपासून मुंबईतील सुमारे पाच हजार दुकानांवर कारवाई

दुकानांच्या मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून मुंबईत आजतागायत ५०५० दुकानांचे नामफलक देवनागरी अर्थात मराठी भाषेत नाही.

140
Marathi Board : कारवाईचा बडगा उगारताच त्या दुकानांनी लावले मराठी नामफलक 

दुकानांच्या मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून मुंबईत आजतागायत ५०५० दुकानांचे नामफलक देवनागरी अर्थात मराठी भाषेत नाही. त्यामुळे ही मुदत शनिवारी संपुष्टात येत असल्याने पुढील दोन दिवसांची शासकीय रजा विचारात घेता येत्या मंगळवारपासून महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाच्यावतीने तपासणी करून त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दुकानांमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे कर्मचारी संख्येप्रमाणे दंड वसूल करण्यात येत आहे. (Marathi Signboards)

राज्य सरकारने मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीतून प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने राबवलेल्या मोहिमेला दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानदारांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आपले मत नोंदवले. न्यायालयाने याबाबत दुकानदारांना प्रश्न विचारत, सरकारने स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मान्य करायला काय हरकत आहे? अशाप्रकारे कोर्ट कचेरीवर पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा असा सल्लाही दिला. यासाठी व्यापाऱ्यांना पुढील महिन्यांची मुदतही न्यायालयाने दिली होती. (Marathi Signboards)

यापूर्वी मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैंकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले होते. तर १० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२२ च्या कालावधीतील १३, ९४२ दुकानांच्या एकूण भेटी दिल्या. तर मराठी पाट्या असलेल्या दुकानांची संख्या ही २३, ४३६ एवढी असल्याची आढळून आले. तर ५२१७ दुकानांना नोटीस बजावल्यानंतरही यासर्व दुकानांनी मराठीतून पाट्या लावल्या नसल्याचे दिसून आले. (Marathi Signboards)

(हेही वाचा – Maharashtra Government : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार ४ टक्के वाढ)

याबाबत मनसेने आधीच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीची आठवण करून देत मराठी पाट्या लावण्याच्या सुचना दुकानदारांना देत याची अमलबजावणी न करणाऱ्यांना इशारा दिला. मात्र, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात ये त असल्याने यापुढे ज्या दुकानदारांनी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून केलेले नाहीत, त्या सर्व दुकानांची तपासणी केली जाणार आहे. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने येत्या मंगळवारपासून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये नोटीस न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार असून दुकानांमधील कामगारांच्या संख्येनुसार प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. गुमास्ता परवानावर असलेल्या कामगारांच्या संख्येनुसार हा दंड आकारुन याची वसूली केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Marathi Signboards)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.