Himanta Biswa Sarma Akbaruddin Owaisi : …तर पाच मिनिटांत हिशोब केला असता; हिमंता बिस्वा सरमा यांचे अकबरुद्दीन ओवैसींना आव्हान 

Akbaruddin Owaisi : 'ही घटना आसाममध्ये घडली असती, तर पोलिसांनी 5 मिनिटांतच हिशोब केला असता', असेही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Akbaruddin Owaisi) यांनी म्हटले आहे.

108
Himanta Biswa Sarma Akbaruddin Owaisi : ...तर पाच मिनिटांत हिशोब केला असता; हिमंता बिस्वा सरमा यांचे अकबरुद्दीन ओवैसींना आव्हान 
Himanta Biswa Sarma Akbaruddin Owaisi : ...तर पाच मिनिटांत हिशोब केला असता; हिमंता बिस्वा सरमा यांचे अकबरुद्दीन ओवैसींना आव्हान 

एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी हैद्राबादमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकावल्याचा मुद्दा जोर धरत आहे. अकबरूद्दीन ओवैसींनी प्रचारसभा घेतली. त्यानंतर एका अधिकाऱ्याने त्यांना त्यांचे भाषण थांबवण्यास सांगितले कारण निवडणूक आचारसंहितेनुसार ते संपले होते. यावर अकबरूद्दीन (Akbaruddin Owaisi) म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब माझ्याकडे घड्याळ आहे. चल आपण इथून…इथून निघून जा. जर मी जनतेला इशारा दिला, तर ते तुमचा पाठलाग करतील.”

(हेही वाचा – Maharashtra Government : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार ४ टक्के वाढ)

ओवैसींविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी ओवैसींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही या प्रकरणावरून अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ही घटना आसाममध्ये घडली असती, तर पोलिसांनी 5 मिनिटांतच हिशोब केला असता’, असेही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Akbaruddin Owaisi) यांनी म्हटले आहे.

…तर लोकांनाही धमक्या जाणवतील

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी तेलंगणामध्ये (Telangana) एका सभेला संबोधित करतांना सांगितले की, जर हे आसाममध्ये घडले असते, तर हे प्रकरण पाच मिनिटांत सोडवले गेले असते. तेलंगाणातील तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बीआरएस किंवा काँग्रेस काहीही बोलत नाहीत. जर पोलिसांना उघडपणे धमकावले गेले, तर लोकांनाही धमक्या जाणवतील”, असे सरमा म्हणाले.

(हेही वाचा – Maharashtra Government : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार ४ टक्के वाढ)

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला अकबरूद्दीन ओवैसी यांची उमेदवारी रद्द करण्याची विनंती केली. (Himanta Biswa Sarma Akbaruddin Owaisi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.