Urban Naxal : राजकीय पक्षांमध्ये अर्बन नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची (Urban Naxal) घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले.

382

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) जी वक्तव्ये करत आहेत. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा आऊट सोर्सिंग करत आहे’, असे वक्तव्य केले. हीच स्थिती सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाची झाली आहे. शिवसेनेत फूट पडताच या गटात सुषमा अंधारे यांनी संधी साधून पक्षात प्रवेश केला. कालपर्यंत हिंदुविरोधी विचार मांडणाऱ्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून तेच विचार मांडत आहेत. अशा प्रकारे राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची (Urban Naxal) घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी रमेश शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

(हेही वाचा – Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.