जुहू चौपाटीवर हरवलेल्या ४१० जणांचा अखेर लागला शोध

मागील दोन दिवसात रमजान ईदमुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढली होती. शनिवारी आणि रविवारी जुहू चौपटीवर ७० ते ८० हजार पर्यटक चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते.

194

जुहू चौपाटीचे आकर्षण केवळ मुंबईकरांना नाही तर देशभरातील लोकांना त्याचे आकर्षण आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांपैकी लहान मुले Missing children आणि जेष्ठ नागरिक हरवण्याचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढत आहे. सांताक्रूझ पोलिसांनी मागील दोन दिवसांत हरवलेल्या १०० जणांचा तर चार महिन्यांत ४१० जणांना शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शोध घेण्यात आलेल्यांमध्ये लहान मुले Missing children आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

रमजान ईदमुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढलेली

मुंबईतील जुहू चौपाटीवर दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात, त्यात मागील दोन दिवसात रमजान ईदमुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढली होती. शनिवारी आणि रविवारी जुहू चौपटीवर ७० ते ८० हजार पर्यटक चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच चौपाटीवर दुर्घटना टाळण्यासाठी सांताक्रूझ पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तासह नियंत्रण कक्ष या ठिकाणी उभारले होते. त्याच बरोबर राज्य राखीव दलाची तुकडी, लाईफ गार्ड पथक तैनात करण्यात आले होते.

(हेही वाचा अखेर दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गेले सर्वोच्च न्यायालयात )

जुहू चौपाटीचा संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, यादरम्यान शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत जवळपास १०० जण हरविल्याच्या तक्रारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या होत्या, त्यात लहान मुले Missing children आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. सांताक्रूझ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा व इतर तांत्रिक बाबीचा वापर करून या दोन दिवसांत हरवलेल्या १०० जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे, मागील चार महिन्यांत जुहू चौपाटीवर हरवलेल्या ४१० जणांचा शोध घेऊन त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप सोपविण्यात आले असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.