राज्य माहिती आयुक्तांचा अनागोंदी कारभार उघड; आदेश काढला पण गंभीर चुका 

राज्य माहिती आयुक्त (बृहन्मुंबई) information commissioner सुनील पोरवाल यांनी १७ एप्रिल २०२३ रोजी आदेश दिला, त्यामध्ये गंभीर चुका आणि आणि माहिती देण्याबाबत पळवाटा शोधण्यात आल्या आहेत.

82

राज्य माहिती आयुक्त (मुंबई) information commissioner सुनील पोरवाल यांनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत अपिलावर जे आदेशपत्र देण्यात आले, त्यामध्ये प्रचंड चुका आढळून असून त्यातून संबंधितांनी पळवाट शोधली असल्याचा गंभीर आरोप अर्जदार वसंत उटीकर यांनी केला.

अर्जदार वसंत उटीकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना राज्य माहिती आयुक्त (बृहन्मुंबई) information commissioner सुनील पोरवाल यांनी १७ एप्रिल २०२३ रोजी आदेश दिला, त्यामध्ये गंभीर चुका आणि आणि माहिती देण्याबाबत पळवाटा शोधण्यात आल्या आहेत. आपल्या वडिलांचे नाव शामराव असे असताना शामराम असे आदेशात लिहिलेले आहे. प्रथम अपील आदेश १५ डिसेंबर २०२२ रोजी झालेला असताना त्याचा दिनांक लिहिलेलाच नाही. सर्व माहितीच्या कागद पत्रांच्या छायांकित प्रती मागितलेल्या असताना, सर्व माहितीच्या कायदा पत्रांच्या छायांकित प्रती असा अतिशय मोठा चुकीचा उल्लेख केलेला आहे, असे उटीकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा अखेर दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गेले सर्वोच्च न्यायालयात )

१० एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांच्या झालेल्या केवळ ३.०० मिनिटांच्या सुनावणीत संबंधित माहिती अधिकारी यांच्याशीच केवळ चर्चा केली. द्वितीय अपिलात ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या मुळ अर्जात उपस्थित केलेल्या मुद्यावंर आपल्याशी कुठलीही चर्चा केलेली/झालेली नाही अथवा कुठलाही युक्तिवाद अजिबातच केलेला किंवा झालेला नाही. परंतु तसे आदेशात नमूद केलेले आहे. आपण केलेल्या व्दितीय अपिलातील अर्जात संबंधित दोषी आढळणा-या माहिती अधिका-यावर information commissioner दंडात्मक व अपिल अधिका-यावर शिस्त भंगाची कार्यवाही माहिती अधिकारातील नियमानुसार करावी व याचा आपणास प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे माहिती अधिकारातील कलम १९(८) (बी) मधील तरतुदीनुसार आपणास १०,००० रुपये मिळावेत, अशी मागणी करत हे आपले सर्व मुद्दे सुनील पोरवाल यांनी आदेश पारीत करते वेळी दुर्लक्षित केले असून संबंधित दोषी आढळणा-या माहिती अधिकारी व अपिल अधिकारी यांना पाठिशी घालण्यात आले आहे. अपिल अधिकारी हे सुनावणीच्या वेळीसही  उपस्थित नव्हते. ते सुनावणीस का उपस्थित राहिलेले नाहीत,  अशी साधी विचारणाही सुनील पोरवालांनी केली नाही कि त्याचे कारणही समजून घेतले नाही. सुनील पोरवाल या राज्य माहिती आयुक्तांकडून अशा प्रकारच्या गंभीर चुका करणे, हे राज्य माहिती आयुक्त या पदाला योग्य नाही, असेही अर्जदार वसंत उटीकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.