अखेर दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गेले सर्वोच्च न्यायालयात 

२१ एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊनही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे या खेळाडूंनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

137

भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात देशातील ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे दिग्गज कुस्तीपटू यांनी पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलन सुरु केले आहे, तसेच ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विनेश फोगाट आणि साक्षी फोगाट यांच्यासह सात महिला पैलवानांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. २१ एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊनही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे या खेळाडूंनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही करणार आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात आतापर्यंत सात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच एफआयआर दाखल करण्यात येईल.लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

(हेही वाचा अजित पवार एकनाथ शिंदेंची भाषा का बोलत आहेत?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.