Mira Road Stone Pelting : मीरा रोड परिसरात श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक; पोलिसांचे शांततेचे आवाहन

Mira Road Stone Pelting : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. अशा राममय वातावरणात मीरा रोड परिसरात 21 जानेवारीला रात्री श्रीरामाच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली.

747
Mira Road Stone Pelting : हा मीरा रोड कि पाकिस्तान ? श्रीराम शोभायात्रेवर 'अल्ला हूं अकबर' घोषणा देत दगडफेक
Mira Road Stone Pelting : हा मीरा रोड कि पाकिस्तान ? श्रीराम शोभायात्रेवर 'अल्ला हूं अकबर' घोषणा देत दगडफेक

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. (Ayodhya Rammandir) देशात आणि विदेशात शोभायात्रा काढून उत्साह व्यक्त केला जात आहे. (Mira Road Stone Pelting) अशा राममय वातावरणात रविवार, 21 जानेवारीला रात्री उशिरा श्रीरामाच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. (Mumbai News) या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर होत आहेत. हे व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : राम मंदिर सोहळा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस)

‘अल्ला हूं अकबर’च्या घोषणा

शोभायात्रेतील ज्या वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते, त्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. या वेळी हल्लेखोरांनी ‘अल्ला हूं अकबर’च्या घोषणा दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे; मात्र पोलिसांनी हा दोन गटांमध्ये वाद असल्याचे सांगितले.

मीरा रोडच्या नया नगर परिसरात धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या शोभायात्रेवर हल्ला केला. या वेळी वाहनांचे नुकसान करण्यासोबत महिलांनाही दुखापत झाली आहे. मीरा रोडच्या नया नगर भागाला गाझा पट्टी देखील म्हणतात.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापना दिवस ही हिंदूंची दिवाळी)

पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेची स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

पोलिसांनी केले आवाहन

नयानगर पोलीस ठाणे हद्दीत 21/01/2024 रोजी रात्रौ 10.30 वा सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद विवाद झाला होता. सध्या सदर ठिकाणी तणाव निवळला असून सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर कोणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच त्यामुळे संभ्रम निर्माण करून घेऊ नये. सोशल मीडियावर येणारे मेसेज खात्री शिवाय कोणीही फॉरवर्ड करू नये. सर्वांनी शांतता राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले आहे.

अयोध्येसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी आहेत. अयोध्येत रामलल्लाच्या भूमीपूजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर रामभक्तांसाठी खुले केले जाणार आहे. (Mira Road Stone Pelting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.