IPL 2024 K L Rahul : के एल राहुलने लखनौ सुपर जायंट्सच्या कट्टर चाहत्याचं असं केलं स्वागत

IPL 2024 K L Rahul : लखनौ संघाच्या चेन्नई येथील विजयानंतरवेंकटेश पलानीचामी यांनी केलेलं सेलिब्रेशन गाजलं होतं. 

70
IPL 2024 K L Rahul : के एल राहुलने लखनौ सुपर जायंट्सच्या कट्टर चाहत्याचं असं केलं स्वागत
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा चेन्नईतील चेपक मैदानात झालेला सामना आठवतोय? या सामन्यात लखनौने विजय मिळवल्यानंतर वेंकटेश पलानीचामी यांनी मैदानात नाच करत आणि उड्या मारत विजयाचा आनंद साजरा केला होता. सभोवताली पिवळ्या रंगाचा चेन्नई चाहत्यांचा सागर उसळलेला असताना पलानीचामी यांचा आनंद सगळ्यांनाच लक्षात राहिला होता. (IPL 2024 K L Rahul)

लखनौ संघ प्रशासनाने पलानीचामी यांना लक्षात ठेवून लखनौ इथं घरच्या मैदानात त्यांना विशेष आमंत्रण दिलं. पलानीचामींना आमंत्रित करण्याबरोबरच त्यांची संघाचा कर्णधार के एल राहुलशीही (K L Rahul) भेट घडवण्यात आली. राहुलने त्यांना संघाची जर्सी प्रदान केली. (IPL 2024 K L Rahul)

(हेही वाचा – Ajit Pawar: बारामतीचं चित्र मी बदलून दाखवीन; अजित पवारांनी सांगितला प्लॅन)

१० सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय

लखनौ सुपर जायंट्स संघाने चेन्नईला या हंगामात दोन्ही सामन्यात पराभूत केलं आहे आणि त्यांचा संघही सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. १० सामन्यांपैकी त्यांनी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील चेन्नईत झालेल्या सामन्यांत चेन्नईने पहिली फलंदाजी कर २१० धावा केल्या होत्या. पण, लखनौने ४ बाद २१३ धावा करत सहा गडी राखून विजय मिळवला होता. (IPL 2024 K L Rahul)

तर लखनौ इथं झालेल्या सामन्यात चेन्नईने समोर ठेवलं १७७ धावांचं आव्हान लखनौने ८ गडी राखून पार केलं होतं. या सामन्यांत लखनौकडून के एल राहुल आणि मार्कस स्टॉईनिस चमकले होते. (IPL 2024 K L Rahul)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.