IPL 2024, M. S. Dhoni : चेन्नईच्या १०३ वर्षांच्या चाहत्यासाठी धोनीची विशेष भेट

IPL 2024, M. S. Dhoni : चेन्नईचे वयोवृद्ध चाहते एस रामदास यांच्यासाठी धोनीने जर्सी दिली आणि त्यावर खास संदेशही लिहिला

94
IPL 2024, M. S. Dhoni : चेन्नईच्या १०३ वर्षांच्या चाहत्यासाठी धोनीची विशेष भेट
IPL 2024, M. S. Dhoni : चेन्नईच्या १०३ वर्षांच्या चाहत्यासाठी धोनीची विशेष भेट
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (IPL 2024, M. S. Dhoni) एक निस्सीम चाहते १०३ वर्षीय एस रामदास यांच्यासाठी धोनीने केलेली एक गोष्ट त्यांना कायम स्मरणात राहील. धोनीने त्यांना आपली जर्सी स्वाक्षरी करून दिलीच. वर त्यावर एक संदेशही लिहिला. चेन्नई फ्रँचाईजीने (Chennai Franchise) हा व्हीडिओ आपल्या हँडलवर शेअर केला आहे. ‘दादा, तुमच्या पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार!’ असं धोनीने जर्सीवर लिहिलं आहे. (IPL 2024, M. S. Dhoni)

(हेही वाचा- ICC Team Rankings : टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा)

रामदास यांचा एक व्हीडिओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यांचा मुलगा या व्हीडिओत त्यांच्याशी संवाद साधत आहे. आणि रामदास आपण चेन्नई संघाचे आणि धोनीचे खूप मोठे चाहते असल्याचं सांगतायत. रामदास यांनी स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली आहे. (IPL 2024, M. S. Dhoni)

अखेर रामदास यांना महेंद्रसिंग धोनीशी (M. S. Dhoni) प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली. मुलाबरोबरच्या व्हीडिओत रामदास यांनी आपल्या क्रिकेट प्रेमाविषयीही भरभरुन सांगितलं आहे. ‘मला लहानपणापासून क्रिकेट आवडतं. पण, तेव्हा चेंडू अंगावर बसेल याची भीतीही वाटायची. पूर्वी मी गोलंदाज होतो. आता टीव्हीवर क्रिकेट पाहतो. २० षटकांचे सामने लवकर संपतात. त्यामुळे ते मी आवडीने बघतो,’ असं या चेन्नईच्या चाहत्याने म्हटलं आहे.  (IPL 2024, M. S. Dhoni)

(हेही वाचा- Ajit Pawar : रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजित दादांच्या राष्ट्रवादीत )

या हंगामात चेन्नईच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेलं नाही. १० सामन्यांपैकी ५ विजय मिळवत संघ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. (IPL 2024, M. S. Dhoni)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.