ICC Team Rankings : टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा

ICC Team Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन संघ अव्वल आहे

86
ICC Team Rankings : टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा
ICC Team Rankings : टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या (ICC Team Rankings) ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन (Australian) संघाने कसोटी क्रिकेटमधील (Test cricket) आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. पण, एकदिवसीय आणि टी-२० (ICC Team Rankings) या पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये भारताने आपला दबदबा कायम राखला आहे. या दोन्ही प्रकारात भारताने क्रमवारीत आपलं अव्वल स्थान राखलं आहे. शुक्रवारी आयसीसीने २०२३-२४ साठीच्या क्रमवारीची म्हणजे वार्षिक क्रमवारीची घोषणा केली. (ICC Team Rankings)

(हेही वाचा- जळगावमध्ये पहिल्याच दिवशी ५२ जणांचे ‘Home Voting’ द्वारे मतदान ; २ दिवस चालणार प्रक्रिया )

कसोटीत ऑस्ट्रेलियाने (Australian) भारताला मागे टाकलं आहे. १२४ रेटिंग गुणांसह त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. गेल्यावर्षीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी भारताचा २०९ धावांनी पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडकडे १०५ रेटिंग गुण आहेत. त्यामुळे कसोटीत खरी चुरस ही ऑस्ट्रेलिया (ICC Team Rankings) आणि भारतातच आहे. इंग्लंड नंतर दक्षिण आफ्रिका १०३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खालोखाल न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा क्रमांक लागतो. (ICC Team Rankings)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून (ICC Team Rankings) पराभव झाला होता. पण, त्यामुळे एकदिवसीय क्रमवारीत भारताला फरक पडलेला नाही. १२२ गुणांसह भारताने अव्वल क्रमांक राखला आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे ११६ गुण आहेत. या अव्वल संघांनंतर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. टी-२० (T-20) क्रिकेटमध्ये भारताकडे २६४ रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियापेक्षा भारताकडे ७ गुण जास्त आहेत. (ICC Team Rankings)

(हेही वाचा- IPL 2024, KKR Superman : शाहरुख खानने कुणाला म्हटलं संघाचा ‘सुपरमॅन’?)

तिसरी जागा इंग्लंडने पटकावली आहे. तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे. (ICC Team Rankings)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.