Ayodhya Ram Mandir Consecration : आज बँका सुरू राहणार का?

खाजगी बँकांना प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. रिझर्व्ह बँकेनंही कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. शेअर बाजार तसंच चलन बाजारही बंद राहणार आहे.

153
Ayodhya Ram Mandir Consecration : आज बँका सुरू राहणार का?

ऋजुता लुकतुके

सोमवार २२ जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमी इथं श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Consecration) असल्यामुळे देशभरात विविध सरकारी कार्यालयं एकतर बंद राहणार आहेत किंवा त्यांनी कामाचे तास कमी केले आहेत. लोकांना घरी राहून हा दिवस साजरा करता यावा यासाठी सरकारनेच आपत्कालीन सुटी कायद्या अंतर्गत काही ठिकाणी कामाच्या वेळात बदल केला आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : राम मंदिर सोहळा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस)

अशावेळी बँकांना सुटी आहे की नाही? बँकांचं काम सोमवारी करता येईल का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर सरकारी बँका सोमवारी २२ जानेवारीला अर्धवेळ सुरू (Ayodhya Ram Mandir Consecration) राहतील आणि दुपारी अडीच वाजता या बँकांमध्ये कामकाज सुरू होईल. तर खाजगी बँकांनी अशी सरसकट सुटी जाहीर केलेली नाही. पण, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या महत्त्वाच्या दोन खाजगी बँकांनी उत्तर प्रदेशातील सर्व बँक शाखा अख्खा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेजारच्या उत्तराखंड राज्यातही हाच निर्णय लागू असेल.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी प्राण त्यागणारे Devidin Pandey कोण होते?)

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने १८ जानेवारीलाच जाहीर केली सुटी –

सरकारी बँकांसाठीची सुटी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने १८ जानेवारीलाच जाहीर केली होती. ‘२२ जानेवारी (सोमवार) या दिवशी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Consecration) साजरा होत आहे. त्या निमित्ताने लोकांना घरी हा दिवस साजरा करता यावा यासाठी सर्व प्रकारची सरकारी कार्यालयं, संस्था आणि विभाग हे दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहतील,’ असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं.

सरकारी बँका दुपारी अडीच वाजताच उघडतील –

त्यानंतर १९ तारखेला अर्थमंत्रालयाने या निर्णयाचा अर्थ स्पष्ट करताना सरकारी बँका, सरकारी वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना हा निर्णय लागू होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सरकारी बँका दुपारी अडीच वाजताच उघडतील. (Ayodhya Ram Mandir Consecration)

(हेही वाचा – Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींनी उचलले मोठे पाऊल)

खाजगी बँकांना प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. पण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश इथं खाजगी बँकांही २२ जानेवारीला बंद असतील. रिझर्व्ह बँकेनंही कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. शेअर बाजार तसंच चलन बाजारही बंद आहे. (Ayodhya Ram Mandir Consecration)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.