Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत 

Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझने आपल्या जीएलसी गाडीच्या लोकप्रियतेनंतर याच गाडीत कूप श्रेणी आणायचं ठरवलं आहे 

550
Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत 
Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत 
  • ऋजुता लुकतुके

मर्सिडिझ बेंझने आपल्या सीएलसी गाडीची कूप श्रेणी आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच लोकांसमोर आणली आहे. आता यावर्षी भारतीय प्रेक्षकांना या गाडीचा आनंद मिळू शकतो. कंपनीची तशी तयारी पूर्ण आहे. एसयुव्ही प्रकारातील ही कूप गाडी असेल. आणि यात दोन इंजिनचे पर्याय भारतीयांसाठी उपलब्ध असतील. एक म्हणजे २ लीटरचं पेट्रोल इंजिन. या इंजिनातून २०४ पीएस, ५५० एनएम इतकी शक्ती निर्माण होईल. तर २ लीटर डिझेल इंजिनातून १९७ पीएस, ४४० एनएम शक्ती निर्माण होईल. (Mercedes Benz GLC Coupe)

(हेही वाचा- Gokhale bridge: पुलाचा खर्च आणखी १० कोटींनी वाढला)

या दोन्ही इंजिनांना ४८ व्होल्टचा हायब्रीड सपोर्टही शक्य आहे. तर प्लग-इन हायब्रीड मॉडेलही कंपनीने उपलब्ध करून दिलं आहे. यात ३१.२ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी आहे. (Mercedes Benz GLC Coupe)

या मर्सिडिझ गाडीत ११.९ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. तर चालकाच्या समोरचा डिस्प्ले १२.३ इंचांचा आहे. शिवाय गाडीला पॅनोरमिक सनरुफही आहे. डॅशबोर्डवर असलेल्या एलईडी दिव्यांमुळे गाडी आतूनही मंद प्रकाशित राहते. ही कुठल्याही मर्सिडिझ उच्च श्रेणीच्या गाडीची खासियत आहे. मर्सिडिझ जीएलसी गाडीत १५ स्पीकर असलेली साऊंड सिस्टिम आहे.  (Mercedes Benz GLC Coupe)

(हेही वाचा- Lok Sabha election 2024 :लोकसभा निवडणुकीपूर्वी ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती; ७५ वर्षांतील मोठी रक्कम)

चालकांच्या सुरक्षेसाठी गाडीतील सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग आहेत. ३६० अंशांचा कॅमेरा असल्यामुळे गाडीच्या सर्व बाजूला चालकाचं लक्ष राहू शकतं. कारण, कॅमेराचं आऊटपुट समोर डिस्प्लेमध्ये दिसणार आहे. शिवाय या कॅमेरांमुळे पार्किंगसाठीही चालकाला मदत मिळते. गाडीत आपत्कालीन ब्रेक प्रणालीही आहे.  (Mercedes Benz GLC Coupe)

(हेही वाचा- IPL 2024, SRH VS RCB : बंगळुरूची पराभवाची मालिका संपेना, हैद्राबादकडून २५ धावांनी पराभव )

भारतात या गाडीची किंमत ६६ लाखांपासून सुरू होईल. तर भारतात या गाडीला स्पर्धा असेल ती ऑडी क्यू५, लेक्सस एनएक्स आणि पोर्श मॅकन यांच्याकडून. (Mercedes Benz GLC Coupe)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.