Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 

Highest Score in IPL : खेळ फक्त २० षटकांचा असला तरी घणाघाती फलंदाजीमुळे २०० पेक्षा मोठी धावसंख्या संघांना कठीण जात नाही 

125
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअर लीग हा खरंतर एका डावात २० षटकांचा फॉरमॅट आहे. पण, खेळाचं वैशिष्ट्यच घणाघाती फलंदाजी हे असल्यामुळे इथं फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. त्या प्रयत्नांत अनेकदा धावांचाही डोंगर उभा राहतो. क्रिकेट जगतातील काही रोमहर्षक आणि मोठ्या धावांचा पाठलाग करणारे सामनेही या स्पर्धेत पाहायला मिळाले आहेत. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- Loksabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले)

एकतर दहा फ्रँचाईजींचे दहा संघ असलेल्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या या स्पर्धेत मग एका डावांत अगदी अडीचशे धावाही सहज होतात. त्यातच बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडिअम आणि अगदी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही त्याच्या तुलनेनं लहान आकारामुळे फलंदाजीचं नंदनवन म्हणून ओळखली जातात. तिथं षटकार अगदी मनाप्रमाणे खेचता येतात. (Highest Score in IPL)

असे उत्तुंग षटकार खेचून अडीचशे पर्यंत धावसंख्या नेलेल्या डावांचा आढावा इथं घेणार आहोत. याच हंगामात आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या अगदी पार २८० धावांच्या पलीकडे गेली आहे. एकूण तीनदा २७० पेक्षा मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- Lok Sabha election 2024 :लोकसभा निवडणुकीपूर्वी ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती; ७५ वर्षांतील मोठी रक्कम)

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत फलंदाजीचे अनेक विक्रम धुळीला मिळून नवे प्रस्थापित झाले आहेत. यात सगळ्यात मोठ्या सांघिक धावसंख्येचा विक्रम तर दोनदा मोडला. विशेष म्हणजे दोन्ही वेळा सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) आधी २७७ आणि मग २८७ अशी धावसंख्या उभी केली आहे. (Highest Score in IPL)

आयपीएलमधली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या याच हंगामात (२०२४) पाहायला मिळाली आहे. सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चिन्नास्वामी मैदानात ३ बाद २८७ धावांचा डोंगर रचला. विशेष म्हणजे बंगळुरूनेही प्रत्युत्तरादाखल ७ बाद २६२ धावा केल्या. हैद्राबादसाठी ट्रेव्हिस हेडच्या ४१ चेंडूंत १०२ धावा मोलाच्या ठरल्या. हैद्राबादच्या फलंदाजीसाठी उतरलेल्या पाचही फलंदाजांनी किमान ३० धावा केल्या. शिवाय त्या इतक्या जलद गतीने झाल्या की, १५ षटकांच्या आत अडीचशे फलकावर लागलेले होते. हेडला हेनरिक क्लासेनने ६७ धावा करत चांगली साथ दिली. सामन्यांत ४४ षटकारांची आतषबाजी झाली. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- Gokhale bridge: पुलाचा खर्च आणखी १० कोटींनी वाढला)

आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे सनरायझर्स हैद्राबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना केलेल्या ३ बाद २७७ धावा. ट्रेव्हिस हेड (Travis Head) (६३) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) (६४) यांनी संघाला तडाखेबंद सुरुवात करून दिली. नंतर हेनरिक क्लासेनने कारकीर्दीतील एक सुरेख खेळी साकारताना ३४ चेंडूंत ८० धावा केल्या. मुंबईकडे हार्दिक, जसप्रीत बुमरा, पियुष चावला अशा अनुभवी गोलंदाजांचा ताफा असताना १८ षटकार सनरायझर्सनी धावसंख्या २७७ वर नेली. याला उत्तर देताना मुंबईनेही निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा केल्या. सामन्यात एकूण ५२३ धावा निघाल्या. ३८ षटकार ठोकले गेले. (Highest Score in IPL)

याच हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनीही दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ७ बाद २७२ धावा केल्या. ३९ चेंडूंत ८५ धावा करणारा सुनील नरेन या धावसंख्येचा शिल्पकार ठरला. अंगक्रिश रघुवंशीनेही ५४ धावा केल्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव झाला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- IPL 2024, SRH VS RCB : बंगळुरूची पराभवाची मालिका संपेना, हैद्राबादकडून २५ धावांनी पराभव )

सर्वोच्च धावसंख्येचा आयपीएल विक्रम मागची दहा वर्षं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या नावावर होता. २०१३ च्या हंगामात पुणे वॉरिअर्स विरुद्ध ५ गडी बाद २६३ धावा केल्या होत्या. यात ख्रिस गेलचा एकट्याचा वाटा होता १७५ धावांचा. त्या त्याने ६६ चेंडूंमध्ये केल्या. त्यानंतर बंगळुरू संघाने पुण्याला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ वर रोखलं. हा सामना १३० धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

गेल्याच हंगामात लखनौ सुपरजायंट्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध पाच बाद २५७ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे पंजाबकडून या सामन्यात एकाही फलंदाजाने शतक ठोकलं नाही. पण, काईल मायर्स आणि मार्कस स्टॉयनिस यांचं अर्धशतक आणि निकोलस पुरन, आयुष बदोनी यांनी ४० धावा करून संघाला अडीचशे पार नेलं. हा सामना त्यांनी ५६ धावांनी जिंकला. (Highest Score in IPL)

(हेही वाचा- Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत )

चेन्नई सुपरकिंग्ज – २८

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २५

मुंबई इंडियन्स – २३

पंजाब किंग्ज – २२

कोलकाता नाईट रायडर्स – २०

राजस्थान रॉयल्स – १८

सनरायजर्स हैद्राबाद – १८

दिल्ली कॅपिटल्स – ११

गुजरात टायटन्स –

लखनौ सुपरजायंट्स –

डेक्कन चार्जर्स –

गुजरात लायन्स –

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.