Mercedes-Benz GLA 2024 : मर्सिडिझ बेंझची नवीन जीएलए एसयुव्ही कार कशी आहे? काय आहे किंमत?

मर्सिडिझ कंपनीने अलीकडेच आपल्या जीएलएस गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणलं होतं. आता आटोपशीर जीएलए गाडीही बाजारात येत आहे. 

209
Mercedes-Benz GLA 2024 : मर्सिडिझ बेंझची नवीन जीएलए एसयुव्ही कार कशी आहे? काय आहे किंमत?
Mercedes-Benz GLA 2024 : मर्सिडिझ बेंझची नवीन जीएलए एसयुव्ही कार कशी आहे? काय आहे किंमत?
  • ऋजुता लुकतुके

मर्सिडिझ बेंझची एकावेळी सात प्रवासी बसू शकतील, अशी जीएसएल एसयुव्ही फेसलिफ्ट व्हर्जन अलीकडेच बाजारात आली आहे. आता त्याच गाडीचा एक आटोपशीर प्रकार कंपनीने लाँच केला आहे. जीएलए प्रकारची ही गाडीही तशीच प्रशस्त आणि मोठी ताकद असलेली आहे. तिचं डिझाईनही कलात्मक आणि राजेशाही आहे. पण, किंमत त्या मानाने आवाक्यातील आहे. (Mercedes-Benz GLA 2024)

या गाडीचं आघाडीचं ग्रिल थोडं जास्त तगडं आणि त्यावरील कंपनीचा लोगोही थोडा मोठा म्हणजेच दणदणीत दिसेल असा करण्यात आला आहे. तर एलईडी दिव्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. तर गाडीचं इंटिरअरही इतर गाड्यांपेक्षा वेगळं आहे. आतमध्ये ब्राऊन आणि काळी रंगसंगती आहे. आणि त्यात चंदेरी रंगही पेरण्यात आला आहे. आतून या गाडीचा लूक कंपनीच्या मेबॅक सीरिजसारखा राजेशाही आहे. (Mercedes-Benz GLA 2024)

अमेरिकेत ही गाडी एंट्री लेव्हल एसयुव्ही मानली जाते. (Mercedes-Benz GLA 2024)

(हेही वाचा – Asian Olympic Qualifier : विजयवीर सिद्धू ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा भारताचा १७ वा नेमबाज)

गाडीतील इन्फोटेन्मेंट प्रणालीही आता बदलण्यात आली आहे. आणि अँड्रॉईड ऑटो तसंच ॲपल कारप्लेचं व्हर्जनही नवीन आणि वायरलेस आहे. गाडीतील सिट प्लस साईझ म्हणजे मोठ्या आहेत. तर चालकाजवळच्या डिस्प्लेवर ‘इनव्हिजिबल बॉनेट’ अशी एक आगळीवेगळी सुविधा आहे. यामुळे गाडीच्या खाली बसवलेल्या कॅमेराच्या मदतीने चालकाला गाडीच्या खालचा रस्ताही दिसू शकतो. (Mercedes-Benz GLA 2024)

मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सिटसमोर डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे. (Mercedes-Benz GLA 2024)

गाडीतील ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन ३८१ अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण करू शकते. तर गाडीची टॉर्क ५०० एनएम इतक्या क्षमतेची आहे. या गाडीची किंमत आहे सुमारे ४८ लाख रुपये. आणि तिची स्पर्धा असेल बीएमडब्ल्यू एक्सवन, वॉल्वो एक्ससी४०, मिनीकूपर कंट्रीमॅन आणि आऊडी क्यू३ शी. (Mercedes-Benz GLA 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.