आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सर्वच क्षेत्रातील वापर अलीकडील काळात वाढत आहे. अनेक क्षेत्रामध्ये वापर केल्यामुळे आपल्याला आधिक अचूक माहिती मिळत आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर आता हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे वादळी वारे, पाऊस यासर्व नैसर्गिक आपत्तीची अचूक माहिती मिळाल्याने सर्वांचा फायदा होणार आहे. तर जास्तीतजास्त फायदा हा शेतकऱ्यांचा होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (Metrological Department)
हवामान विभाग ओडिशा आणि मध्यप्रदेशात गडगडाटी वादळ आणि मुसळधार पावसाची प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेण्यासाठी चाचणी स्थळ तयार करीत आहे. त्यामुळे अंदाज सुधारण्यास मदत होऊ शकते. अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माहिती देताना सांगितले. १९०१ पासूनच्या माहितीचे डिजिटायझेशन केले आहे. हा डेटा ‘एआय’साठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. (Metrological Department)
(हेही वाचा : Asian Olympic Qualifier : विजयवीर सिद्धू ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा भारताचा १७ वा नेमबाज)
सिमला येथे महत्वाच्या नोंद वह्या
१५ जानेवारी १८७४ रोजी सिमला येथे हवामान विभागाची स्थापन केली. त्यानंतर तो शिवाजीनगर येथे पुण्यात हलविला गेला. त्यासाठी दगडी इमारत बांधली. येथे १८७४ पासूनच्या नोंदवह्या आजही पाहायला मिळतात. त्याचे डिजिटायझेशन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community