FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा अर्जेंटिनाकडून लाजिरवाणा पराभव, पुरुषांचा मात्र पेनल्टी-शूटआऊटवर विजय

FIH Pro League Hockey : प्रो लीगचा युरोपीयन टप्पा सध्या सुरू आहे. 

66
FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा अर्जेंटिनाकडून लाजिरवाणा पराभव, पुरुषांचा मात्र पेनल्टी-शूटआऊटवर विजय
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिला व पुरुषांच्या हॉकी संघासाठी बुधवारचा दिवस संमिश्र ठरला. प्रो हॉकी लीगच्या युरोपीयन टप्प्यावर पहिला सामना महिलांनी ०-५ असा गमावला. तर त्याच प्रतिस्पर्ध्यांसमोर म्हणजे अर्जेंटिनासमोर पुरुषांनी ५-४ असा पेनल्टी शूटआऊटवर निसटता विजय मिळवला. महिला संघ हरेंद्र सिग या नवीन प्रशिक्षकांबरोबर पहिल्यांदा खेळतोय. आणि पहिल्याच सामन्यात संघातील कितीतरी कच्चे दुवे उघड झाले. अनुभवी गोलकीपर सविता पुनियाला सुरुवातीला अकरा जणांमध्ये स्थान मिळालं नाही आणि बदली गोली देवी खरिबमचा बचाव भक्कम नव्हता. (FIH Pro League Hockey)

भारतीय महिला गोलच्या संधीही निर्माण करू शकल्या नाहीत. उलट अर्जेंटिनाने १३, २४, ४१ असे प्रत्येक क्वार्टरमध्ये एकेक गोल डागले. चौथ्या क्वार्टरमध्ये तर ६ मिनिटांच्या खेळात दोन सलग गोल झाले. आणि भारतीय संघ ०-५ असा पिछाडीवर पडला. एवढी पिछाडी भरून काढणं शक्यच नव्हतं. भारतीय महिलांच्या खेळात एकसंधपणा दिसून आला नाही. आणि खेळात वेगाचा अभावही होता. (FIH Pro League Hockey)

(हेही वाचा – ‘संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही’; वाचा सविस्तर Amit Shah काय म्हणाले?  )

दुसरीकडे पुरुषांच्या सामन्यात मात्र निर्धारित एका तासात २-२ अशी बरोबरी साधल्यावर पेनल्टी शूटआऊटवर भारतीय पुरुषांनी ५-४ असा विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताचे दोन्ही गोल मैदानी होते. आणि भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. अकराव्या मिनिटालाच मनदीप सिंगने पहिला गोल केला. आणि पाठोपाठ ललित कुमार उपाध्याय या कसलेल्या मधल्या फळीतल्या खेळाडूने दुसरा अवघड गोल केला. पण, अर्जेंटिनाचा संघही आक्रमकच होता. आणि त्यांनीही भारतील गोलजाळ्यावर हल्ले करणं सोडलं नाही. विसाव्या मिनिटाला ल्युकास मार्टिनेझने पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाचा पहिला गोल केला. आणि ६० व्या मिनिटाला टॉमस डोमिनने बरोबरी साधून दिली. (FIH Pro League Hockey)

तुल्यबळ संघांमधील एक वेगवान लढत या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली. भारतीय पुरुष आणि महिला संघांचा पुढील सामना आता यजमान बेल्जिअमशी होणार आहे. (FIH Pro League Hockey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.