T20 World Cup 2024 : अमेरिकेचा टी-२० स्पर्धेत बांगलादेशला दे धक्का 

T20 World Cup 2024 : डॅलस इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं ३ चेंडू राखून बाजी मारली 

133
T20 World Cup 2024 : अमेरिकेचा टी-२० स्पर्धेत बांगलादेशला दे धक्का 
T20 World Cup 2024 : अमेरिकेचा टी-२० स्पर्धेत बांगलादेशला दे धक्का 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अमेरिकन क्रिकेट (American Cricket) संघाला आत्मविश्वास देणारा एक निकाल संघाच्या बाजूने लागला आहे. कसोटी दर्जा असलेल्या बांगलादेश संघाला (Bangladesh team) अमेरिकन संघाने (American teams) १५४ धावा करत हरवलं आहे. आगामी टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेचे काही साखळी सामने अमेरिकेतही होणार आहेत. टी-२० क्रमवारीत अमेरिकन संघ १९ व्या क्रमांकावर आहे. यजमान देश म्हणून त्यांनाही टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) खेळण्याची संधी मिळणार आहे.

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : पीओकेवर बोलताना इंडि आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली!)

अशावेळी हा मोठा विजय खेळाडूंचा मनोधैर्य उंचावणारा असेल हे नक्की. बांगलादेशने या सामन्यात पहिली फलंदाजी करताना ६ बाद १५३ धावा केल्या. तौहिद ह्रदयने ४७ चेंडूंत ५८ धावा केल्या. तर अमेरिकेकडून स्टिव्हन टेलरने ९ धावा देत २ बळी मिळवले. याला उत्तर देताना अमेरिकेनं आपले २ गडी ९ धावांत गमावले होते. पण, कोरे अँडरसन (Corey Anderson) आणि हरमीत सिंग (Harmeet Singh) यांनी डाव सावरला आणि अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (T20 World Cup 2024)

पंधरा षटकांत अमेरिकन संघाची अवस्था ५ बाद ९४ अशी होती. विजयासाठी आणखी ६० धावांची आवश्यकता होती. पण, कोरे अँडरसन (Corey Anderson) आणि हरमित सिंग (Harmeet Singh) यांची जोडी जमली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६१ धावांची भागिदारी केली. अँडरसनने २५ चेंडूंत ३४ धावा केल्या. तर हरमितने १३ चेंडूंत ३३ धावा केल्या. हरमित फक्त १८ वर्षांचा आहे. (T20 World Cup 2024)

शेवटच्या षटकांतही अमेरिकेला विजयासाठी ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. पण, अँडरसनने पहिल्या ३ चेंडूंवर १० धावा वसूल करून सामना जिंकून दिला. आता या मालिकेतील दुसरा सामना येत्या गुरुवारी ह्यूस्टनला होणार आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.