Thane Mumbra Accident : ठाण्यात विचित्र अपघात! सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीमध्ये उलटला, एका मुलाचा मृत्यू, ६ जखमी

158
Thane Mumbra Accident : ठाण्यात विचित्र अपघात! सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीमध्ये उलटला, एका मुलाचा मृत्यू, ६ जखमी
Thane Mumbra Accident : ठाण्यात विचित्र अपघात! सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीमध्ये उलटला, एका मुलाचा मृत्यू, ६ जखमी

मुंब्रा परिसरात एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात (Thane Mumbra Accident) झाला आहे. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर एका सोसायटीची संरक्षण भिंत तोडून उलटला. या अपघातात सात मुलं दुर्दैवीरित्या जखमी झाल्याचं समजते आहे. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. (Thane Mumbra Accident)

(हेही वाचा –BMC Secondary Schools मधून शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना यंदापासून अर्थसहाय्य)

आमदार जितेंद्र आव्हाड यांनींही रात्री घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, अपघात झालेला सिमेंट मिक्सर वाहनाला पोलीस कर्मचाऱ्यांकडून हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम करण्यात आले. आरएमसी व्हॅनचा तोल जाऊन सोसायटीच्या आवारात कोसळल्याने ६ लहान मुलं गंभीर जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंब्रा येथील सम्राट नगर येथे ही घटना घडली. (Thane Mumbra Accident)

(हेही वाचा –T20 World Cup, Ind vs Can : कॅनडा विरुद्धच्या सामन्यानंतर शुभमन गिल, आवेश खान भारतात परतणार)

बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खडी सिमेंट मिक्स करणाऱ्या आर एम सी व्हॅनचा अपघात शनिवारी (१५ जून) रात्री घडला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर आरएमसी व्हॅन चालक फरार झाला. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव झाला होता. (Thane Mumbra Accident)

या घटनेमध्ये १ मृत व्यक्ती (Thane Mumbra Accident)

१) नासिर शेख (पु / १४ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केल्यानंतर मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.)

या घटनेत ६ जण जखमी.. (Thane Mumbra Accident)

१) विशाल सोनावणे (पु/ २५ वर्षे / प्राईम हॉस्पिटल, मुंब्रा येथे दाखल करण्यात आले आहे.)
२) अशिक इनामदार (पु / 15 वर्षे / गौतमी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)
३) प्रभाकर सलियान (पु / ४८ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
४) अब्दुल वफा (पु/ ५० वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
५) फरीद शेख (पु / ५४ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल, मुंब्रा)
६) आशा दाधवड (स्त्री / ५८ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.