West Bengal : नंदीग्राममध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला

101
West Bengal: नंदीग्राममध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला

पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व मेदिनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम (Nandigram) येथे एका महिला भाजपा कार्यकर्त्याची (Female BJP Worker) हत्या करण्यात आली. या महिलेच्या हत्येला सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) जबाबदार धरले जात असून गुन्हेगारांना त्यांनी पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवारी, (२२ मे) रात्री सोनाचुरा परिसरात घडली.

या हल्ल्यात अनेक भाजपा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला कोलाकाता (Kolkata) येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अद्याप कोणालाही अटक नाही
येथील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे संपूर्ण नंदीग्राम परिसरात तणावाचे वातावरण आहे. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी तृणमूलविरोधात निदर्शने केली. तृणमूलने मात्र हा हल्ला केल्याचे नाकारले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : अमेरिकेचा टी-२० स्पर्धेत बांगलादेशला दे धक्का )

रतिबाला यांच्या मुलाची प्रकृती गंभीर
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाचे समर्थक रात्री सोनाचुराच्या मानसपुकुर बाजारपेठेत पहारा देत होते. त्यावेळी काही बाईकस्वार गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांनी रतिबाला आद्री नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला लक्ष्य केले आणि तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. ती रस्त्यावर पडली आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात रतिबालाचा मुलगा संजय आद्रीही गंभीर जखमी झाला. पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते बाईकवरून आलेले गुंड पळून गेले. स्थानिक गावकऱ्यांनी रतिबाला आणि इतर जखमींना तातडीने नंदीग्राम सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी रतिबाला हिला मृत घोषित केले. रतिबाला यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने कोलकाता येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नंदीग्रामचे भाजपा नेते मेघनाद पाल म्हणाले, “निवडणुकीपूर्वी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तृणमूलच्या गुंडांनी हा हल्ला केला. अभिषेक बॅनर्जी बुधवारी नंदीग्राममध्ये बैठक घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्या बैठकीनंतर काही तासांतच भाजपा कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, हे धक्कादायक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.