Maratha Reservation : हिंसक आंदोलकांवर उगारला कायद्याचा बडगा; पोलीस महासंचालकांनी दिली माहिती

53
बीड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली असून या संचारबंदीत बुधवार १ नोव्हेंबर रोजी सकाळपासून शिथिलता देण्यात आली आहे. पण जमावबंदी लागू आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
राज्यात ठिकठिकाणी  Maratha Reservation साठी आंदोलने झाली असून काही ठिकाणी ही आंदोलने शांततेत तर काही ठिकाणी हिंसक स्वरूपात आंदोलन झाली. या आंदोलनांत काही ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटनादेखील घडल्या. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आरोपींना अटक देखील केली आहे, असे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले.
आतापर्यंत  Maratha Reservation साठी आंदोलनाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे 29 ते 31 नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 7 गुन्हे हे कलम 306 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. महाराष्ट्रात 24 ते 31 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 141 गुन्हे दाखल झाले आहेत आणि 168 आरोपींना अटक केली आहे. तर 146 आरोपींना कलम 41 नुसार नोटीस देण्यात आली आहे, असेही रजनीश शेठ यांनी सांगितले.

12 कोटींचे नुकसान

संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेले आहे. आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपनी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दिले आहेत. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. सात हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.