MNS : राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मांडली मनसेची भूमिका; टोल, मुंबई-गोवा महामार्ग आणि मराठा आरक्षण…सगळे काही रोखठोक

61
ठाकरे घराण्यात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा राजकीय क्षेत्रात कायम वावर दिसत असतो, परंतु  MNS अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे कायम राजकरणापासून दूर दिसत होत्या, मात्र आता शर्मिला ठाकरेही अपवाद ठरल्या आहेत, त्यांनी प्रथमच टोल, मुंबई – गोवा महामार्ग आणि मराठा आरक्षण या सर्व तापलेल्या विषयांवर रोखठोक भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भविष्यात शर्मिला ठाकरे यांचाही मनसेच्या राजकीय व्यासपीठावर वावर दिसेल, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

मुंबईतील टोल वसुलीतून महाराष्ट्रातील सगळे रस्ते सिमेंटचे करता येतील

टोलनाके आणि टोल वसुली हा विषय मनसेच्या अजेंड्यावर कायम वरच्या स्थानी राहिलेला आहे.  MNS ने आता मुंबईतील सर्व प्रवेशद्वारांवर स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामाध्यमातून मनसे मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांची मोजदाद करणार आहे. याविषयावर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मनसे १५ दिवस सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबईत किती वाहने ये-जा करतात याची पाहणी करणार आहे. दर दिवशी दहिसर टोलनाक्यावरून लाखो वाहने येत-जात असतात. मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरून जेवढी टोलची वसुली होत आहे. त्यातून सगळ्या महाराष्ट्रातील रस्ते सिमेंटचे करता येतील, मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने ती दिसत नाही, असा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केला.

कर दात्यांच्या पैशाचा अपव्यय

आम्ही कोकण जागर यात्रा काढली. त्यावर सरकारने आम्हाला मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करून ती सुरु करण्याचे आश्वासन दिले, पण ते आश्वासन पूर्ण झालेच नाही. काम सुरु असताना एक पूल कोसळला आहे. कशासाठी ही कामे करत आहेत? सगळेच पैसे घरी न्या, कर दात्यांच्या पैशाचा हा अपव्यय आहे, अशीही टीका शर्मिला ठाकरे यांनी केली. मराठा आरक्षणावर  MNS ने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. आर्थिकदृष्ट्या जे गरीब आहेत, ज्यांना शिक्षणाची सोय नाही, त्यांना आरक्षण देण्यात यावे ही भूमिका आम्ही बाळासाहेबांच्या काळापासून हेच सांगत आहोत. प्रत्येक जातीला पोट असते आणि प्रत्येक जातीच्या मुलाला चांगल्या शाळा हव्या असतात, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.