Lok Sabha Election 2024 : भाजपाने महाराष्ट्रातील ०७ खासदारांचे तिकीट कापले   

राज्यात २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले होते. त्यापैकी ०७ खासदारांना यावेळी भाजपने तिकीट नाकारलं असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

162
Lok Sabha Election 2024 : भाजपाने महाराष्ट्रातील ०७ खासदारांचे तिकीट कापले   

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २६ एप्रिल पर्यंत दोन टप्प्यात लोकसभा मतदान पूर्ण झाले असून उर्वरित तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीचा (Mahayuti) जागेचा तिढा अजून सुटलेला नाहीये. अशातच भाजपाने काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली आहे. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे २३ खासदार निवडून आले होते. त्यापैकी ०७ खासदारांना यावेळी भाजपाने तिकीट कापले आहे.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Painter Samuel Morse: ‘सिंगल-वायर टेलिग्राफ’ शोधात मोलाचं योगदान देणारे चित्रकार, अमेरिकन संशोधक कोण ?)

उत्तर मुंबईतून गेल्या वेळी साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेले गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री – पीयूष गोयल (Union Minister – Piyush Goyal) यांना संधी देण्यात आली. उत्तर- पूर्वचे खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांच्याऐवजी आ. मिहिर कोटेचा यांना भाजपने मैदानात उतरविले.तसेच उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्याऐवजी अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांना मैदानात उतरविण्यात आले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha: मनसे- उबाठा गट आमने- सामने! रत्नागिरीत राजकीय वातावरण तापणार)

मुंबईशिवाय, सोलापूर, बीड, अकोला आणि जळगावमध्येही भाजपाने विद्यमान खासदारांना तिकीट नाकारत इतर उमेदवारांना संधी दिलीय. यात बीडमधून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याऐवजी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर अकोल्यात संजय धोत्रे (Sanjay Dhotre) च्या जागी पुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळाली आहे. सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंचा (Union Minister Sushil Kumar Shinde) पराभव करणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तिकिट कापण्यात आले आहे. त्यांच्याजागी यावेळी भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.