Mumbai cement concrete road : रस्त्यांच्या भेगांवर आय आय टी च्या प्राध्यापकांनी सुचवला हा पर्यांय

530
Mumbai cement concrete road : रस्त्यांच्या भेगांवर आय आय टी च्या प्राध्यापकांनी सुचवला हा पर्यांय
Mumbai cement concrete road : रस्त्यांच्या भेगांवर आय आय टी च्या प्राध्यापकांनी सुचवला हा पर्यांय
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेने (BMC) येत्या काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याची गरज असल्याचे आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकीl विभागाचे प्राध्यापक डॉ. के.व्ही. कृष्णराव (Dr. K.V. Krishna Rao) यांनी  स्पष्ट केले. (Mumbai cement concrete road)
मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची अत्युच्च दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळा शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याचा शुभारंभ  मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त  आयु्क्त (प्रकल्प)  अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. के.व्ही. कृष्णराव (Dr. K.V. Krishna Rao), उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले (Ulhas Mahale), प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) मनिषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्ते कामांमध्ये नियुक्त अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५० हून अधिक महानगरपालिका अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांचा या कार्यशाळेमध्ये सहभाग होता. (Mumbai cement concrete road)
रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे
सिमेंट काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना (Prof. Dr. Solomon Debarna) यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानांचीही त्यांनी माहिती दिली.  (Mumbai cement concrete road)
चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्यांच्या आयुर्मनात वाढ 
आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव (Dr. K.V. Krishna Rao) यांनी सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या डिझायनिंगच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ याअनुषंगाने विचार करून सुयोग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परिक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान वाढ होवू शकते, यासह इतर आवश्यक बाबींचाही त्यांनी उहापोह केला. तसेच प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला.  (Mumbai cement concrete road)
New Project 100
सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामात झाडांचा अडसर
उपस्थित अभियंत्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये मुंबईतील अंतर्गत सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामांमध्ये झाडांच्या अडथळ्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या मुद्द्यावर काय उपाययोजना करता येतील ? याबाबतची विचारणा केली. त्यावर बोलताना डॉ. राव यांनी उद्यान विषयातील तज्ज्ञांकडून वैज्ञानिक पद्धतीवर आधारित उपाययोजना करण्याचे सूचविले. (Mumbai cement concrete road)
गुणवत्ता नियोजनासाठी सक्षम नियोजनाची गरज
सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा चुकांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाअभावी येतात. त्यामुळे गुणवत्ता नियोजनासाठी यापुढच्या काळात विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपणे नियोजन करण्याची गरज उपआयुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले यांनी कार्यशाळेच्या समारोपाच्या प्रसंगी व्यक्त केली. (Mumbai cement concrete road)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.