Chitra Wagh : सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा सुळेंवर घणाघात

सुप्रिया सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय अशी शंका येत असल्याचा आरोपही वाघ यांनी ट्विटमध्ये केला.

146
Chitra Wagh : सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा सुळेंवर घणाघात
Chitra Wagh : सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा सुळेंवर घणाघात

मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे ह्या वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत असून, यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा टराटरा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी ट्विटद्वारे केली. सुप्रिया सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय अशी शंका येत असल्याचा आरोपही वाघ यांनी ट्विटमध्ये केला. (Chitra Wagh)

वाघ यांनी म्हटले आहे की, सुळे यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळे पिवळे दिसते त्याप्रमाणे सुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले तरी त्यात वावगेच दिसते. सुप्रियाताई, हा आजार बरा नव्हे त्यामुळे लवकर उपचार घ्या असा खोचक सल्लाही वाघ यांनी दिला. (Chitra Wagh)

(हेही वाचा – Sachin Tendulkar Statue : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण; काय आहे वैशिष्ट्य ?)

वड्याचे तेल वांग्यावर.. या म्हणी प्रमाणे सुप्रियाताई आपल्या भावाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राग फडणवीस यांच्यावर काढत असून त्याचा काहीच फायदा होणार नाही. या परिस्थितीतही तुमचा चिडचिडेपणा का वाढलाय याचे कारण राज्यातील सूज्ञ जनतेला माहित आहे. सत्ताधारी आमदारांची कदापि तुम्ही चिंता करू नका त्यांचा ठाम विश्वास सरकारवर आहे. तुम्हीच तुमच्या आमदारांची काळजी करा कारण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे हे तुम्हाला कळून चुकले असेलच. त्यामुळे ‘अर्श से फर्श’ अशी केविलवाणी स्थिती तुमची झाली असून याहून अधिक अधोगती ती काय असू शकते असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. (Chitra Wagh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.