यंदा प्रजासत्ताक दिनी परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार, काय आहे कारण?

83

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आले आहे, पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही.

राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीने निवड होत असल्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी संधी नसणार आहे. यापूर्वी 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नव्हता. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरचे हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावे लागते, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते.

( हेही वाचा: ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला फ्लेमिंगोची प्रतीक्षा; वाचा कारण )

महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरतो

प्रजासत्ताक दिनी होणा-या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणा-या संचालनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच, 1983 मध्ये बैलपोळा या महाराष्ट्राच्या चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.