
Zilla Parishad Schools: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ११ हजार ७९८ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. २०२५-२६च्या पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार, ही पदे रिक्त असल्याने मराठी शाळांना गुरुजींची गरज असून शिक्षक नसल्याने शाळांची शिक्षण गुणवत्ता धोक्यात आली आहे.
महायुती सरकारकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अंतिम नियुक्त्या रखडल्याने शेकडो शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
हेही वाचा – Nitin Gadkari यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! सर्व ‘डीपफेक’ व्हिडिओ तातडीनं हटवण्याचे निर्देश
राज्यातील हजारो डीएड, बीएड, टीआयटी पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप पात्रता परीक्षा कागदपत्रे पडताळणी आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. जिल्हा परिषद शाळांमधील ११ हजार ७९८ पदे रिक्त असल्याने मराठी शाळांवर याचा निश्चित वाईट परिणाम होत आहे. अंतिम नियुक्त्या रखडल्याने शाळा बंद पडण्याच्या उंबरठय़ावर आहेत.
जिल्हा रिक्तपदे
पालघर ९००
नाशिक ७२०
यवतमाळ ७०१
कोल्हापूर ६०६
चंद्रपूर ६१०
अमरावती ५८०
गोंदिया ५५८
ठाणे ५२३
पुणे ५००
गडचिरोली ४५०
सोलापूर ५२५
सांगली ४७९
नागपूर ४५०
रायगड ४४५
हेही पहा –

