Mark Zuckerberg झुकले! मुलांचे लैंगिक शोषण आणि डीपफेक प्रकरणी मागितली जाहीर माफी

81
Mark Zuckerberg speaking about Meta's apology for deepfake content
Mark Zuckerberg addresses concerns over deepfake content.

मेटा (Meta) आणि भारत सरकार यांच्यातील वाद आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी डीपफेक कंटेंटसंदर्भात (Deepfake Content) सरकारची माफी मागितली आहे. त्यांनी सीएसएएम (बाल लैंगिक शोषणाचे साहित्य) डीपफेक कंटेंट आणि प्लॅटफॉर्मच्या कामकाजातील चुकांबद्दल माफी मागितली आहे. मेटाने कबूल केले आहे की, विशिष्ट प्रकारच्या कंटेंटला प्रोत्साहन (Boots) देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. (Mark Zuckerberg)

(हेही वाचा – Kalyan मध्ये जाळ्यात अडकलेल्या अतिविषारी घोणसला जीवदान )

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने मेटाला स्पष्टपणे सांगितले की, केवळ कोणती सामग्री कोणाला उपलब्ध होईल हे कंपनी ठरवते म्हणून ती ‘मध्यस्थी’ या व्याख्येत येत नाही. सरकारने असेही म्हटले की, आयटी कायद्यांतर्गत असलेले ‘सेफ हार्बर’ संरक्षण मेटाला लागू होणार नाही. तसेच मेटाने या प्रकरणात आपली चूक मान्य केली, खेद व्यक्त केला आणि माफी मागितली. (Mark Zuckerberg) 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबाबत सरकारने व्यक्त केली चिंता
सरकारने मेटाला स्पष्टपणे सांगितले की, सर्व परिस्थितीत भारतीय कायद्याचे पालन केले पाहिजे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबाबतही सरकारने चिंता व्यक्त केली. यापूर्वी, सरकारने पंतप्रधान मोदींची पोस्ट हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भारत सरकारने प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह आणि असभ्य मजकुराचा मुद्दाही उपस्थित केला. मेटाने उत्तर दिले की, कठोर अंतर्गत नियम लागू आहेत. मेटाने म्हटले की, प्लॅटफॉर्मचा हेतुपुरस्सर गैरवापर कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य आहे.

सरकारने मेटाच्या अधिकाऱ्यांना बोलावले
बुधवारी ५ ऑगस्टला सकाळी, मेटाच्या जागतिक टीमने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (आयटी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हटवल्याप्रकरणी केंद्र सरकारने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. या बैठकीत टीकात्मक पोस्टवर करण्यात आलेली अयोग्य कारवाई, बाल लैंगिक शोषण आणि पिळवणूक करणाऱ्या सामग्रीला (CSAM) प्रभावीपणे आळा घालण्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आलेले अपयश आणि इतर नियामक मुद्द्यांवर चर्चा झाली.


(हेही वाचा – Nitin Gadkari यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! सर्व ‘डीपफेक’ व्हिडिओ तातडीनं हटवण्याचे निर्देश)

मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने बुधवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. पंतप्रधान मोदींची अलीकडील फेसबुक पोस्ट तात्पुरती काढून टाकल्यानंतर सरकारने मेटाच्या सर्वोच्च जागतिक अधिकाऱ्यांना बोलावल्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण होती. पंतप्रधानांनी तरुणांना संबोधित केले आणि प्रश्नपत्रिका फुटीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले. अमेरिकन कंपनीने या घटनेसाठी तांत्रिक बिघाडाला जबाबदार धरत माफी मागितली आणि पोस्ट चुकून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. ती नंतर पूर्ववत करण्यात आली.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.