Nitin Gadkari यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! सर्व ‘डीपफेक’ व्हिडिओ तातडीनं हटवण्याचे निर्देश

Nitin Gadkari यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! सर्व 'डीपफेक' व्हिडिओ तातडीनं हटवण्याचे निर्देश

101
Nitin Gadkari Deepfake Videos
Nitin Gadkari Deepfake Videos

इथेनॉल मिश्रण धोरणासंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित खोटे आणि दिशाभूल करणारे ‘डीपफेक’ व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत, एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओंमुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Nitin Gadkari Deepfake Videos)

(हेही वाचा : काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर Sunetra Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वेळ आल्यावर….”)

न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकल खंडपीठाने हे स्पष्ट केले की, गडकरी यांनी त्यांच्या याचिकेत दाखवलेली सर्व सामग्री सकृतदर्शनी बदनामीकारक आहे. त्यामुळे इंटरनेटवरून ती तात्काळ हटवण्यात यावी, तसेच भविष्यातही गडकरी यांनी अशा प्रकारची कोणतीही बदनामीकारक माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यास तीही हटवावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.(Nitin Gadkari Deepfake Videos)

(हेही वाचा : Indian Cargo Ship Sunk:  भारतीय जहाजावर भीषण हल्ला! जहाज बुडालं; लाल समुद्रात १४ खलाशांच्या सुटकेचा थरार)

याचिकेत काय म्हटलंय?

“सार्वजनिक आयुष्यात धोरणांवर होणारी लोकशाही मार्गातील निष्पक्ष टीका, चर्चा किंवा मतभेदांचा मी पूर्ण आदर करतो. हे न्यायालयीन पाऊल कोणाचाही बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्यासाठी नाही. मात्र, एआय आणि डीपफेकचा वापर करून केलेली चरित्रहनन करणारी, खोटी आणि बदनामीकारक सामग्री कायदेशीर अपराध आहे,” असे नितीन गडकरी यांनी आपल्या याचिकेत स्पष्ट केले आहे. न्यायालयात गडकरी यांच्या बाजूने अॅडव्होकेट संदीप एस. लड्डा यांनी बाजू मांडली, तर केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाची बाजू अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी सांभाळली.(Nitin Gadkari Deepfake Videos)

(हेही वाचा : आता UPI व्यवहारांसाठी मोजावे लागणार पैसे? संसदेत विधेयक सादर; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?)

सायबर प्लॅटफॉर्म्सवर कडक शब्दांत टिप्पणी

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या आक्षेपार्ह सामग्रीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. अशा प्रकारची आक्षेपार्ह किवा बदनामीकारक माहिती स्वतःहून हटवण्यासाठी प्लॅटफॉर्म्सकडे कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी वारंवार न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात, यावर खंडपीठाने भाष्य केले.(Nitin Gadkari Deepfake Videos)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.