अखिल भारत हिंदू महासभेच्या धर्माचार्य प्रकोष्ठाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्नाकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
(हेही वाचा CJP च्या आंदोलकांमध्ये सराईत गुन्हेगारांना सोडणार नाही; केंद्र शासनाने Supreme Court मध्ये मांडली भूमिका)
या कार्यक्रमाला हिंदू महासभेचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयसिंग कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे, सहकार्यवाह नितीन शुक्ल आणि संघटक उमेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या नियुक्तीमुळे धर्माचार्य प्रकोष्ठाचे संघटन अधिक बळकट होईल, तसेच हिंदू समाजाच्या हितासाठी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन गती मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Aniket Shastri)
Join Our WhatsApp Community

