Palghar Flood : पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर

103
Palghar Flood : पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर
Palghar Flood : पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर
  • मुंबई प्रतिनिधी

Palghar Flood : गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Municipal Corporation) क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी तसेच दुकानदार, टपरीधारक यांनाही मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. (Palghar Flood)

(हेही वाचा – राष्ट्रीय शुद्धीकरण दिन; सोलापुरात ५ जणांचा Hindu धर्मात विधीवत पुनर्प्रवेश)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी २८ जुलै रोजीच्या बैठकीत पालघर जिल्ह्यात पूरपस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt) मदत घोषित केली. त्यानुसार पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी १० हजार तसेच घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीपोटी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. (Palghar Flood)

अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत घोषित करण्यात आली आहे. तर नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी प्रति झोपडी १५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांसाठी ४० हजार,ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रति ३२ हजार तर लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची मदत दिली जाईल. बाधित दुकानदारांना जास्तीत जास्त ५० हजार तर टपरीधारकांना जास्तीत जास्त १० हजार रुपयांची मदत घोषित झाली आहे. (Palghar Flood)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.