IIT Bombay Student Suicide FIR : आयआयटी मुंबईमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केल्यानंतर पोलिसांनी एका प्राध्यापकासह इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.
जातीय अपशब्द वापरल्याचा आरोप
दरम्यान, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याला त्याच्या जातीय पार्श्वभूमीवरून कथितरीत्या त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. वडिलांनी FIRमध्ये प्राध्यापकाकडून गेल्या काही महिन्यांपासून छळ होत असल्याचे म्हटले आहे. मात्र, IIT Bombay प्रशासनाने संस्थेत जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप नाकारला आहे. IIT Bombayचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी संस्थेत विद्यार्थ्यांच्या जातीय माहितीचा वापर प्रशासन किंवा प्राध्यापकांकडून केला जात नसल्याचे सांगितले. (IIT Bombay Student Suicide FIR)
आयआयची मुंबईच्या SC/ST सेलनेही विद्यार्थ्याच्या नावाने जातीय भेदभावासंदर्भात कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा: Maharashtra Rain Alert : राज्यात धो-धो पाऊस! पुढील काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट जारी
साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी आपल्या मुलाला काही काळापासून त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, साहिलने त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. मात्र, त्या वेळी कुटुंबाने IIT प्रशासनाकडे औपचारिक तक्रार केली नव्हती. कुटुंबीयांनी सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. (IIT Bombay Student Suicide FIR)
आरोपींवर कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका वडिलांनी घेतली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. तपास क्राइम ब्रँचकडे सोपवल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
नेमके प्रकरण काय?
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव साहिल रवींद्र वाकोडे असे आहे. तो आयआयटी मुंबईमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह कॅम्पसमधील हॉस्टेलच्या खोलीत आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. (IIT Bombay Student Suicide FIR)
हेही वाचा: अनुदानित घरगुती LPG रिफिल्ससाठी ‘या’ तारखेपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य
साहिल शुक्रवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत झालेल्या परीक्षेला बसला होता. या परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचे समोर आले आहे.
IIT Bombay च्या म्हणण्यानुसार, साहिलने परीक्षेतील प्रश्नपत्रिका AI प्लॅटफॉर्मवर, विशेषतः ChatGPTवर, अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा केली आणि त्याचे समुपदेशन केले. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असे त्याला सांगण्यात आल्याचे IIT Bombayने म्हटले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आणि साहिलच्या कुटुंबाचे म्हणणे यापेक्षा वेगळे आहे. त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढून निलंबीत करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. (IIT Bombay Student Suicide FIR)
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या Section 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच SC/ST (Prevention of Atrocities) Act मधील संबंधित तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

