Madhya Pradesh High Court: भोजशाळा संकुल मशीद नाही, तर…उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

80
भोजशाळा संकुल, धार्मिक स्थळ, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय
Madhya Pradesh High Court: भोजशाळा संकुल मशीद नाही, तर...उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Madhya Pradesh High Court: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद वादावर शुक्रवारी (१५मे) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की, हे संकुल म्हणजे सरस्वती देवीचे मंदिर आहे. मुस्लिम पक्षाने केलेला कमल मौला मशीद असल्याचा दावा यावेळी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला असून मशि‍दीसाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे.

काही हिंदु समुयादायाने भोजशाळा हे देवी सरस्वतीचे मंदिर असल्याचा दावा केला होता, तर मुस्लिम पक्षाने याच ठिकाणाला कमल मौला मशीद म्हणून ओळखले जाते, असे सांगितले होते. याशिवाय जैन समुदायातील एका याचिकाकर्त्याने येथे मध्ययुगीन जैन मंदिर आणि गुरुकुल अस्तित्वात असल्याचे प्रतिपादनही केले. न्यायालयाने या सर्व दाव्यांचा बारकाईने विचार केला.

हेही वाचा – PBKS vs MI Highlights : ‘मला असं होताना दिसत नाही,’ असं बुमराह का म्हणाला?

या दाव्यांचा विचार करून न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की, या वास्तूला मंदिराचे स्पष्ट धार्मिक स्वरुप आहे तसेच दोन्ही न्यायाधीशांनी विश्वास व्यक्त केला की, संकुल मंदिर स्वरुपाचे असल्याने मुस्लिम समुदाय पर्यायी जागेसाठी अर्ज करू शकतो तसेच भोजशाळा संकुल आणि कमल मौला मशीद ही दोन्ही संरक्षित स्मारके असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

२००३ चा ASI आदेश रद्द
उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा (ASI) वर्ष २००३ चा आदेश रद्दबातल ठरवला. या आदेशाने हिंदू उपासकांच्या पूजेच्या अधिकारावर निर्बंध घातले होते आणि मुस्लिमांना प्रार्थनेची परवानगी दिली होती. हा निर्णय रद्द झाल्याने आता हिंदू समुदायाला पूर्ण अधिकार प्राप्त झाले आहेत.

सुनावणीचा कालावधी
इंदूर खंडपीठाने ६ एप्रिल रोजी या प्रकरणातील पाच याचिका आणि एक रिट अपिल यावर नियमित सुनावणी सुरू केली. सर्व पक्षांच्या युक्तिवादांसह सादर केलेल्या पुराव्यांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने निर्णय मंगळवार, १२ मे रोजी राखून ठेवला होता. शुक्रवारी (१५ मे) हा दीर्घप्रतीक्षित निकाल अर्थात ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.