PM Narendra Modi : प्रभू श्रीराम सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक

प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलीकडे आहे. प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

122
PM Narendra Modi : प्रभू श्रीराम सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक
PM Narendra Modi : प्रभू श्रीराम सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक

प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलीकडे आहे. प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. आंध्रप्रदेशच्या लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एनएसीआयएनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (PM Narendra Modi)

नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सटे (एनएसीआयएन) उद्घाटन केल्यानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, ‘सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी मी ११ दिवस उपवास करत आहे. प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलीकडे आहे. प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक आहेत’. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – R. K. Singh : देशात वीज क्षेत्रातील उत्पादकांसाठी मोठी बाजारपेठ)

भगवान राम त्यांचा भाऊ भरतला म्हणाले होते की, मला विश्वास आहे तू वेळ न घालवता कामे पूर्ण करतोस आणि यामुळे खर्चही कमी होतो. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारदेखील (Central Govt) अशाचप्रकारे आपल्या खर्चाकडे लक्ष देत आहे. आम्ही जीएसटीच्या (GST) रुपाने देशाला एक नवीन आधुनिकता दिली. आम्ही ७ लाख रुपयांपर्यंत करात सूट दिली. यामुळे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा कर वाचला. देशातील करदात्याला आपल्या कराचा योग्य वापर झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे ते पुढे येऊन कर भरत आहे. जनतेकडून जे काही घेतले, ते जनतेला अर्पण केल्याचे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) यावेळी सांगितले. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.