Benjamin Franklin : वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी असलेले अमेरिकेतील बहुआयामी व्यक्तीमत्व बेंजामिन फ्रँकलिन

Benjamin Franklin : फ्रँकलिन हे फिलाडेल्फियामध्ये (Philadelphia) एक यशस्वी वृत्तपत्र संपादक आणि मुद्रक झाले. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पेनसिल्व्हेनिया गॅझेट प्रकाशित केले.

326
Benjamin Franklin : वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी असलेले अमेरिकेतील बहुआयामी व्यक्तीमत्व बेंजामिन फ्रँकलिन
Benjamin Franklin : वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी असलेले अमेरिकेतील बहुआयामी व्यक्तीमत्व बेंजामिन फ्रँकलिन
बेंजामिन फ्रँकलिन (Benjamin Franklin) जगाच्या इतिहासातलं वजनदार व्यक्तिमत्व. बेंजामिन फ्रँकलिन हे एक अमेरिकन पॉलिमॅथ (बहुआयामी व्यक्तिमत्व), लेखक, शास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी, मुत्सद्दी, मुद्रक, प्रकाशक आणि राजकीय नेते होते. विशेष म्हणजे बेंजामिन हे युनायटेड स्टेट्सच्या (United States) संस्थापकांपैकी एक होते.
यशस्वी वृत्तपत्र संपादक आणि मुद्रक
फ्रँकलिन यांचा जन्म १७ जानेवारी १७०६ रोजी मॅसॅच्युसेट्स बे प्रांतातील बोस्टनमधील मिल्क स्ट्रीट येथे झाला. लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण होते. त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारांमध्ये ते अग्रेसर असायचे. फ्रँकलिन हे फिलाडेल्फियामध्ये (Philadelphia) एक यशस्वी वृत्तपत्र संपादक आणि मुद्रक झाले. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पेनसिल्व्हेनिया गॅझेट प्रकाशित केले.
ब्रिटीश संसद आणि क्राउनच्या धोरणांवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध
१७६७ नंतर ते पेनसिल्व्हेनिया क्रॉनिकलशी (Pennsylvania Chronicle) जोडले गेले. हे वृत्तपत्र क्रांतिकारक स्वभावाचे होते आणि ब्रिटीश संसद आणि क्राउनच्या धोरणांवर टीका करण्यासाठी ओळखले जायचे. अकाडेमी ऍंड कॉलेज ऑफ फिलाडेल्फियाचे ते पहिले अध्यक्ष होते. त्याचबरोबर अमेरिकन फिलॉजोफिकल सोसायटीचे (American Philosophical Society) ते सचिव होते आणि १७६९ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून देखील आले.
आफ्रिकन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न
१७८५ ते १७८८ पर्यंत त्यांनी पेनसिल्व्हेनियाचे अध्यक्ष म्हणून काम केले. पूर्वी त्यांच्याकडे गुलाम होते आणि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात गुलामांच्या “विक्रीसाठी” जाहिराती देखील प्रकाशित केल्या होत्या. मात्र १७५० नंतर त्यांनी (Benjamin Franklin) गुलामगिरीच्या विरोधात आंदोलन केले. पुढे त्यांनी आफ्रिकन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. तसेच त्यांच्या शिक्षणाला देखील प्रोत्साहन दिले. (Benjamin Franklin)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.