BJP : लोकसभेसाठी भाजपचे “गावाकडे चला” अभियान

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाकडून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक गावाकडे चला अभियान सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान जवळपास ४० दिवस चालणार आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून भाजपा १ लाख ४० हजार गावांपर्यंत पोहोचणार आहे.

128
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपाने (BJP) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाकडून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक गावाकडे चला अभियान सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान जवळपास ४० दिवस चालणार आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून भाजपा (BJP) १ लाख ४० हजार गावांपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन थेट संपर्क साधणार असल्याची माहिती भाजपच्या (BJP) सूत्रांनी दिली. (BJP)

प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे (BJP) नेते गावोगावी जाणार आहेत. तसेच तिथे बैठका घेणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या (Central Govt) योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहेत. त्याशिवाय सरकार जनतेसाठी आणखी काय करू शकते याबाबत गावातील लोकांचे मतही विचारात घेणार आहेत. तसेच या अभियानादरम्यान गावोगावी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची माहितीही भाजपा (BJP) नेते जनतेला देतील. भाजपाचे प्रत्येक गावात चला अभियान (Go to Village campaign) जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. (BJP)

(हेही वाचा – UBT चे जनता न्यायालय की राजकीय जाहीर सभा?)

५ ते ८ गावांना भेट देण्याची भाजपाची रणनीती

या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील १ लाख ४० हजार गावांमध्ये भाजपाचे (BJP) नेते पोहोचतील. तसेच ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधणार आहे. दररोज प्रत्येक जिल्ह्यातील ५ ते ८ गावांना भेट देण्याची भाजपाची (BJP) रणनीती आहे. यात लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) विकसित भारत संकल्पाबाबत (Vikasit Bharat Sankalp) माहिती दिली जाईल. भाजपाचे (BJP) हे अभियान आगामी निडणुकीत गेमचेंजर ठरू शकते असा दावा केला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी मतदारांशी थेट संपर्क साधला जाणार आहे. तसेच त्यांनी लाभ घेतलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.