Lok Sabha 2024 : विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, निष्पक्ष आणि निर्भिडपणे वातावरणात मतदान व्हावे यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने विविध माध्यमांव्दारे जनजागृती

110
विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी
विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

लोकसभा निवडणुका २०२४ (Lok Sabha 2024) च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नियुक्त केलेले राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (Dharmendra s. Gangawar) (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा) विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (M. K. Mishra)(सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला भेट देवून येथील कामकाजाची पाहणी केली. (Lok Sabha 2024)

(हेही वाचा – मुंबईतील Coastal Road बोगद्यात पहिला अपघात; उद्घाटनानंतर काही दिवसांतच घडली घटना

माध्यम नियंत्रण कक्षामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्यांचा दर दोन तासांचा तसेच मुद्रित माध्यमांचा अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला जातो. तसेच लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी केली जात असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे (DGIPR) संचालक डॉ.राहुल तिडके यांनी सांगितले. (Lok Sabha 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदारांची काय आहे ‘मन की बात’? केंद्राच्या कामावर नाखुश; पण…

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, निष्पक्ष आणि निर्भिडपणे वातावरणात मतदान व्हावे यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने विविध माध्यमांव्दारे जनजागृती करावे तसेच निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमांना जास्तीत जास्त प्रसिध्दी द्यावी. अशा सूचना विशेष निवडणूक निरीक्षक यांनी केल्या. (Lok Sabha 2024)  

(हेही वाचा – BMC : नालेसफाईच्या कामांमध्ये कुचराई झाल्यास यंदा मुंबईकर जाणार पुरात वाहून)

यावेळी माध्यम नियंत्रण कक्षाचे सहसचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यावेळी उपस्थित होते. (Lok Sabha 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.