मालमत्ता करात सवलतीसाठी मोबाईल-ईमेल लिंक बंधनकारक; KDMC ची कल्याण-डोंबिवलीकर करदात्यांना सूचना

483
कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे दोन्ही रूग्ण धोक्याबाहेर; KDMC कडून दक्षतेचे आवाहन
कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे दोन्ही रूग्ण धोक्याबाहेर; KDMC कडून दक्षतेचे आवाहन
  • कल्याण, प्रतिनिधी

KDMC         कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मालमत्ता करात सवलतीचा लाभ आणि करासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केडीएमसीच्या मालमत्ता कर विभागाने या संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. (KDMC)

(हेही वाचा – साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाचे गाणे थेट PM Modi यांच्या इन्स्टाग्रामवर! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल)

महानगरपालिकेच्या http://www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर Property KYC पर्यायावर क्लिक करून Property No नोंदवून मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अपडेट करता येणार आहे. यामुळे करदात्यांना मालमत्ता कर सवलतीची माहिती, बिल, पावती आणि इतर नोटिसा थेट मोबाईलवर मिळतील. ही सुविधा सर्व प्रभाग कार्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. (KDMC)

(हेही वाचा – Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! शिवसेना उबाठाच्या ६ खासदारांच्या सुरक्षेचा तिढा; नेमकं घडतंय काय?)

कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी करदात्यांना तातडीने मोबाईल-ईमेल लिंक करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि करदात्यांना वेळेत माहिती मिळेल. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक करदात्याने ही नोंदणी करणे आवश्यक असल्याचे मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केले आहे. (KDMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.