Garba In Ambulance : चक्क गरबा खेळायला जाण्यासाठी वापरली शासकीय रुग्णवाहिका आणि पुढे झाला घात …

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम पासून गोखले कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे

23
Garba In Ambulance : चक्क गरबा खेळायला जाण्यासाठी वापरली शासकीय रुग्णवाहिका आणि पुढे झाला घात ...
Garba In Ambulance : चक्क गरबा खेळायला जाण्यासाठी वापरली शासकीय रुग्णवाहिका आणि पुढे झाला घात ...

सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रीची धूम सुरु आहे. सर्व तरुण-तरुणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर मध्ये चक्क गरबा खेळण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका वापरली. त्यातच या रुग्णवाहिकेची दोन दुचाकींना धडक दिली आहे. हा सर्व प्रकार समजताच जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत रुग्णवाहिकेची चौकशी करून मार्गस्थ केले. रुग्णांसाठी असलेली रुग्णवाहिका गरबा खेळण्यासाठी जायला वापरल्याने नागरिक संतप्त झाले होते. (Garba In Ambulance)

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम पासून गोखले कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी (१५ ऑक्टोबर) रात्री १० वाजताच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी गरबा खेळण्यासाठी जायला चक्क सीपीआर रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली. यावेळी रुग्णवाहिकेतून प्रवास करताना चक्क सायरन वाजवत रुग्णवाहिका भरधाव निघाली होती. या रुग्णवाहिकेने एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले व पुढे जाऊन तिने गाडीला धडक दिली. (Garba In Ambulance)

यावेळी काही नागरिकांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला तेव्हा चालका शेजारी दोन युवती बसल्याचे लक्षात आले. यावेळी नागरिकांनी ही रूग्णवाहिका थांबवली आणि रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडण्यास सांगितले यावेळी सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र, नागरिकांनी दबाव टाकल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. यावेळी रुग्णवाहिकेत गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी दाटीवाटीने बसल्याचे दिसून आले.

(हेही वाचा : Nitesh Rane : नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा)

रुग्णवाहिकेतील मुलींकडे अधिक चौकशी केली असता गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले.उपस्थित नागरिकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली असता जुना राजवाडा पोलिसांचे गस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाच्या परवाना तपासून रुग्णवाहिका सोडून दिली. मात्र, रुग्णवाहिकेचा वापर गरबा खेळायला जाण्यासाठी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.