Nitesh Rane : नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा

37
Nitesh Rane : नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा

हिंदूंच्या नवरात्री उत्सवामध्ये मूर्तिपूजा होते. मुसलमान जर मूर्तिपूजा मानत नाहीत, तर ज्या नवरात्रोत्सवात मूर्तिपूजा होते, तिथे ते का शिरकाव करत आहेत? पूर्वीचे हिंदू असलेल्या आताच्या मुसलमानांना हिंदूंच्या नवरात्रोत्सव आणि इतर सण-उत्सवांत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी रितसर हिंदू धर्मात प्रवेश करावा. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांना मदत करतील. हा पर्याय सुद्धा आम्ही देत आहोत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे (Nitesh Rane) आमदार नितेश राणे यांनी केले आहे. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवरात्रोत्सवात गैर हिंदूंना प्रवेश वर्ज्य’ या विषयावरील विशेष कार्यक्रमात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) पुढे म्हणाले की, नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात अनेक मुसलमान युवक आपले खोटे ‘हिंदू’ नाव सांगून हिंदू युवतींशी ओळख वाढवतात. नंतर हेच विषय ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’पर्यंत जातात. हे सर्व रोखण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी गरबा कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासूनच सर्वांना प्रवेश द्यावा. ती व्यक्ती हिंदू नसल्यास त्यांना प्रवेश देऊ नये. तसेच हिंदू युवतींनी सुद्धा आपण नेमके कोणाबरोबर गरबा खेळतो आहोत, याविषयी सतर्क असले पाहिजे. आपली मुलगी सुरक्षित घरी येत आहे ना, हे पालकांनीही पाहिले पाहिजे. (Nitesh Rane)

(हेही वाचा – Israel Hamas War : तुमच्या प्रियजनांची आम्ही लवकरात लवकर भेट घडवून आणू; नेतान्याहू यांचे आश्वासन)

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात हिंदू युवती आणि महिलांना खोटी स्वप्ने दाखवून फसवले जाते. हिंदू युवतींसोबत लग्न करून त्यांना विविध इस्लामी देशांत विकले गेल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. भारतातील अन्य राज्यांत लागू झालेल्या ‘लव्ह जिहादविरोधी कायद्या’चा अभ्यास करून महाराष्ट्रातही कडक आणि परिणामकारक असा कायदा येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार आहे. जिहाद्यांना वर्ष २०४७ ला भारत एक इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, त्यासाठी हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’ला बळी पाडून हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’च्या प्रकरणांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या कमी होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल आणि हिंदूंची लोकसंख्या अशा प्रकरणांमुळे कमी होऊ द्यायची नसेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असेही आमदार राणे (Nitesh Rane) यांनी शेवटी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.