Ashish Shelar : “गर्वसे कहो हम एमआयएम हैं”सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल; आशिष शेलार यांचा खोचक टोला

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा "गर्वसे कहो हम हिंदू है" होती.

122
Ashish Shelar : ...शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..!; ॲड. आशिष शेलार यांची उबाठावर टीका

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं” अशी केली असून ती आदित्य ठाकरे पर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अँड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. (Ashish Shelar)

ते पुढे म्हणाले की, ५० ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धवजी करत आहेत. मात्र आपल्याच पक्षात तुकडे पडलेले असताना ते सावरण्याऐवजी हे त्याला समाजवादाची ठिगळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याच विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जाज्वल्य हिंदुत्व मांडलं पण त्यांच्या सुपुत्राने काय करून दाखवले. त्याची यादी मोठी आहे. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन म्हटलं आणि स्वतः मुख्यमंत्री पदी बसले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. बाळासाहेब यांच्या सुपुत्राने अहमद पटेल समोर कुर्नीसात घालणारे चित्र दाखवलं. राम मंदिरावरही प्रश्न निर्माण करून राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टाही केली. हे सर्व विशिष्ट वर्गाच्या मतासाठी लांगुलचालनाची सुरुवात त्यांनी केलेली उभा हिंदुस्थान आणि महाराष्ट्र पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Nana Patole : सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल)

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सत्कारा बद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना आ. ॲड. शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागताशी भाजपचा काहीही संबंध नाही. बीसीसीआयचा ही यात संबंध नाही. हा आयसीसीचा कार्यक्रम आहे. पण उद्धव ठाकरे यांना विस्मृती झाली असेल त्यांना आठवण करून देतो आम्हाला प्रश्न विचारायची हिम्मत त्याने करावी जो स्वच्छ आहे. उद्धव ठाकरे तुमच्या घरात दाऊदचा जावई असलेला पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद यांना तुम्ही बिर्याणी खायला घातली. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचारू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना भारतावर हल्ला करणाऱ्यांना साथ देणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवण्याचे काम केले. त्यांनी आता आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये, अशा परखड शब्दात त्यांनी उध्दव ठाकरे यांना सुनावले. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.