Crime : ड्रगमाफिया ललित पाटील पळाला की पळवला, गूढ कायम…

शेळ्यांच्या नावाखाली त्याने मेफेड्रोन पाठवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे

33
Crime : ड्रगमाफिया ललित पाटील पळाला की पळवला, गूढ कायम...
Crime : ड्रगमाफिया ललित पाटील पळाला की पळवला, गूढ कायम...

पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटील आपल्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा (Crime) उपयोग करून परदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे, कारण पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने मलेशिया, थायलंड आणि दुबईमध्ये मेफेड्रोन निर्यात केल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शांतपणे रुग्णालयातून पळून गेल्यामुळे तो पळाला की पळवले असा प्रश्न विचारला जात आहे. रात्रंदिवस प्रयत्न करूनही पुणे पोलिसांची १० पथके अद्यापही ललित पाटीलला (lalit patil) शोधू शकलेली नाहीत.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन २ ऑक्टोबरला ललित पाटील फरार झाले. तो ससूनमधील कैद्यांसाठी असलेल्या कोठडीत परत येईल, अशी आशा पोलिसांना होती, पण तो पुन्हा ससून रुग्णालयात आला नाही. ललित पाटील कोणाला संशय येऊ नये म्हणून देश-विदेशात शेळ्या निर्यातीचा व्यवसाय करत असे. त्याचा भाऊ भूषण पाटील याच्यासोबत त्याने दुबईला शेळ्या पाठवल्याची नोंद पोलिसांना सापडली आहे, मात्र प्रत्यक्षात शेळ्यांच्या नावाखाली त्याने मेफेड्रोन पाठवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड या इतर देशांमध्येही त्याने मेफेड्रोन पाठवलं होतं. अशा प्रकारे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने त्यांचं ड्रग निर्यातीचं जाळं विस्तारलं होतं. याशिवाय ललित पाटील पुणे कारागृहात असताना त्याच्या कुख्यात गुन्हेगारांसह पोलीस दलातील बडतर्फ अधिकाऱ्यांसोबत सूत जुळल्याची माहिती देण्यात येत आहे.

(हेही वाचा – Ashti Railway: अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)

गुन्हेगारी क्षेत्रासह शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्याने त्याचे व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते. ससून रुग्णालयात असताना पोलिसांनी २ कोटींचे ड्रग जप्त करून कारवाई केली होती, मात्र त्याने यंत्रणांनाच हाताशी धरून पळ काढला. त्यामुळे ललित पाटीलचा शोध लागल्याशिवाय त्याचे देशविदेशात पसरलेले जाळे, त्याला मदत करणाऱ्याबाबत माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळे त्याला पळवणाऱ्यांचीही तो पकडला जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.