Ashti Railway: अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही रेल्वेचं मोठं नुकसान झालं

109
Ashti Railway: अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Ashti Railway: अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला (Ashti Railway) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यात शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही रेल्वेचं (Railway) मोठं नुकसान झालं असून रेल्वेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा – Nitesh Rane : नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा)

या आगीत रेल्वेचे तीन ते चार डबे जळून पूर्ण खाक झाले आहेत. या आगीत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. रेल्वेडब्यांना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Fire brigade vehicles reached the spot) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.