Bhidewada : भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार; पुणे महापालिका आणि राज्य सरकारचं मोठं यश

उच्च न्यायालयातील भिडेवाड्याचा खटला पुणे महापालिकेने जिंकला

27
Bhidewada : भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार ! पुणे महापालिका आणि राज्य सरकारचं मोठं यश
Bhidewada : भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होणार ! पुणे महापालिका आणि राज्य सरकारचं मोठं यश

पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाडा (Bhidewada) ही ऐतिहासिक वास्तू आहे. भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. भिडेवाडा स्मारकासंदर्भातील खटला उच्च न्यायालयात सुरू होता. हा खटला पुणे महापालिकेने (pune municipal corporation) पर्यायाने राज्य सरकारने जिंकला. त्यामुळे लवकरच भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू केलं जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भिडेवाडा स्मारकामुळे अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची बिजं रोवली गेली. भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती, मात्र कायदेशीर अडचणींमुळे या स्मारकाचं काम रखडलं. समता परिषदेनेही यासाठी लढा दिला. हा वाद उच्च न्यायलायत सुरू होता. त्यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याकरिता मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे (Puna Merchant Bank Chairman Vijay Dhere ) यांच्याशी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

(हेही वाचा – Garba In Ambulance : चक्क गरबा खेळायला जाण्यासाठी वापरली शासकीय रुग्णवाहिका आणि पुढे झाला घात … )

पुणे महानगरपालिकेने हेरिटेज वास्तूंची यादी तयार केली होती, त्या यादीत भिडेवाड्याचा समावेश आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २१ फेब्रुवारी २००६ रोजी मान्यता दिली होती. भिडेवाडा दुरुस्तीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी तरतूद करण्यात येत होती. २०१९-२०२०च्या अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेच्या ताब्यात जागा आलेली नव्हती, मात्र आता उच्च न्यायालयातील भिडेवाड्याचा खटला महापालिका पर्यायाने राज्य सरकारने जिंकल्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.