Kalyan : २० दिवस उलटूनही तिसगाव नाक्यावरील रस्ता जैसे थे; पावसापूर्वी डांबरीकरण न झाल्यास चिखलाचे साम्राज्य पसरण्याची भीती

रहिवाश्यांसह पादचारी, प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये संताप

55
खराब रस्ता आणि गॅस लाईन खोदकामाचा दृश्य
Kalyan : २० दिवस उलटूनही तिसगाव नाक्यावरील रस्ता जैसे थे; पावसापूर्वी डांबरीकरण न झाल्यास चिखलाचे साम्राज्य पसरण्याची भीती
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan            कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरात महानगर गॅस वितरण कंपनीकडून करण्यात आले गॅस लाईनचे खोदकाम थांबून तब्बल २० दिवस उलटले आहेत. मात्र खोदून ठेवलेला रस्ता अद्यापही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने पादचारी, रहिवासी प्रवासी आणि वाहनचालकांनामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याची परिस्थिती अशीच राहिली तर दुचाकीस्वारांच्या घसरगुंड्या आणि छोटे-मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Kalyan)

सदर रस्त्यावरील खड्डा केवळ माती, खडी आणि दगडी भूशाने बुजवून ठेवण्यात आला आहे. त्यावर अद्याप डांबरीकरण करण्यात आले नाही. तिसगाव नाका ते आझाद प्लंबर या मार्गाच्या मध्यभागी गॅस लाईनसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. स्थानिकांच्या आक्षेपानंतर काम थांबले असले, तरी खोदलेल्या रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. सध्या रस्त्याच्या मध्यभागी टाकलेली माती आणि खडी वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी खचू लागली आहे. त्यामुळे रस्ता असमतल बनला आहे. (Kalyan)

(हेही वाचा – Dombivli Station वर थरार! धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्ध फटीत अडकणार, तेवढ्यात…)

पावसाळ्यात साऱ्यांची उडणार त्रेधातिरपीट

पावसाला कोणत्याही क्षणी सुरूवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मात्र अद्याप डांबरीकरण न झाल्याने पहिल्याच पावसात हा भराव खचून पुन्हा मोठे खड्डे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह वाहनचालक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या मार्गावर तिसगाव नाका रिक्षा स्टँड असल्याने शेकडो रिक्षा दिवसभर या रस्त्यावरून प्रवास करतात. आधीच खराब झालेल्या रस्त्यामुळे रिक्षांच्या दुरूस्तीच्या खर्चात वाढ झाली आहे. टायर, सस्पेन्शन आणि इतर सुट्या भागांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भिती रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे. (Kalyan)

(हेही वाचा – Mumbai Local Megablock: मध्य रेल्वे घेणार ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक, मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम; पाहा वेळापत्रक)

प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

एकीकडे खोदकाम करणाऱ्या महानगर गॅस वितरण कंपनीला या समस्येची कोणतीही चिंता दिसत नाही. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडूनही या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या भागातील रहिवासी करत आहेत. परिणामी रहिवासी आणि वाहनचालक अशा दोघांनाही प्रशासनाच्या निष्क्रियतेची किंमत मोजावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने डांबरीकरण करून हा रस्ता वाहतुकीस सुरक्षित बनवावा. तसेच संबंधित कंपनीकडून दर्जेदार दुरूस्ती करून घ्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह व्यापारी आणि रिक्षाचालकांनी केली आहे. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.