झारखंडमध्ये शासकीय नोकरभरती परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आता कमालीचे उग्र बनले आहे. जयपाल सिंह स्टेडियम येथे गेल्या बारा दिवसांपासून शेकडो तरुण आंदोलक प्रशासनाविरोधात ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनादरम्यान सात पेक्षा जास्त विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले असून विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी २ ऑगस्टपासून अन्न-पाण्याचा पूर्णपणे त्याग केला आहे. (JPSC Paper Leak)
(हेही वाचा – स्वातंत्र्यदिनाआधी BJP ची मोठी रणनिती; राज्यभर काय घडणार? )
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या परीक्षा घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू केला असून, या प्रकरणात आणखी पाच मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या नवीन अटकेमुळे आतापर्यंत पकडण्यात आलेल्या एकूण गुन्हेगारांची संख्या १९ वर पोहोचली आहे.
मंत्र्यांच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण नाकारले; सार्वजनिक व्यासपीठावरच चर्चेची मागणी
राज्यातील वाढता असंतोष पाहून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अखेर आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सरकारने चार प्रमुख मंत्र्यांची एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून, यामध्ये उच्च शिक्षण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्र्यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात वरुणराजाचा जोर कायम; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा)
चर्चा करण्यास नकार
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेचे अधिकृत निमंत्रण दिले होते. मात्र, संतप्त विद्यार्थ्यांनी बंद खोलीत कोणत्याही प्रकारची गुप्त चर्चा करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या घोटाळ्याशी संबंधित सर्व चर्चा खुल्या मैदानात आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर जाहीर व्यासपीठावरच व्हावी, अशी ठाम भूमिका तरुणांनी घेतली आहे.
हेही पहा –


