Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचे कारण आले समोर

जे जे रुग्णालयाने दिला शवविच्छेदनाचा अहवाल

148
Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचे कारण आले समोर
Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचे कारण आले समोर

नितीन चंद्रकांत देसाईंचा बुधवारी सकाळी त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये मृतदेह आढळून आल्याने चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली. त्यांच्या आकस्मित मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह काल ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवला होता. तिथे ४ डॉक्टरांच्या पथकांने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. नितीन देसाईंचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालात समोर आली. शवविच्छेदन झाल्यानंतर नितीन देसाईंचे पार्थिव पुन्हा एन. डी स्टुडिओत नेले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – Vijay Wadettiwar : अखेर विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार विराजमान)

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. देसाईंचा मोबाईल तपासला असता त्यात काही ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलीस या ऑडिओ क्लिपच्या मदतीने आधिक तपास करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.